( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Nana Patekar Last Video: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा शेवटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नाना पाटेकर मंचावरील कलाकारांसोबत नाचताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, निधनाच्या काही दिवस आधीच ते एका कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. त्यांचा हा व्हिडिओ पाहून चाहते भावुक झाले आहेत.
रविवारी डोनापावला येथील ताज सिदादे दे गोवा येथे ‘सम्राट क्लब इंटरनॅशनल’, इस्टेट-१च्या स्थापना समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नाना पाटेकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी पारंपरिक गोवन नृत्यात कलाकारांसोबत ठेका धरला. एवढंच नाही तर त्यांनी वाद्यही वाजवलं. नाना पाटेकर यांचा याच कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
या कार्यक्रमात नाना पाटेकर नेहमीप्रमाणे साध्या पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसले. त्यांच्या साधेपणाने आणि उत्साही अंदाजाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यशैलीचे कौतुकही केले.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना नाना पाटेकर यांनी मराठीत मनोगत व्यक्त केले. जीवन आणि मृत्यूबाबत बोलताना त्यांनी मृत्यू अटळ असल्याचे सांगितले होते.
“मी उद्या इथे असेन की नाही, हे मला माहीत नाही. ती वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच. पण ते घडण्यापूर्वी मला स्वतःला विचारावं लागेल की, मला जे करायचं आहे तेच मी करत आहे का?” असं नाना पाटेकर म्हणाले होते.
पुढे त्यांनी कुटुंबाबद्दलही भाष्य केलं. “मला माझ्या पत्नीसाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या घरासाठी जगायचं आहे… म्हणून जगा आणि मरा,” असं ते म्हणाले होते.
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या या शब्दांचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी उत्साहाने नाचणारे आणि उपस्थितांशी संवाद साधणारे नाना पाटेकर आता आपल्यात नसल्याने चाहते आणि कलाकार भावुक झाले आहेत.






