Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घुंमगराच्या तालात नव्या युगाची चाहूल, नृत्यसंस्कृतीला नवा आयाम; कथ्थक ते फ्युजनपर्यंत तरुणाईचा वाढतोय कल

एकेकाळी मंदिर, रंगमंच आणि शास्त्रीय परंपरेपुरते मर्यादित मानले जाणारे नृत्य आज नव्या पिढीच्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम बनले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 06, 2026 | 01:55 PM
घुंमगराच्या तालात नव्य युगाची चाहूल, नृत्यसंस्कृतीला नवा आयाम; कथ्थक ते फ्युजनपर्यंत तरुणाईचा वाढतोय कल

घुंमगराच्या तालात नव्य युगाची चाहूल, नृत्यसंस्कृतीला नवा आयाम; कथ्थक ते फ्युजनपर्यंत तरुणाईचा वाढतोय कल

Follow Us
Follow Us:

पुणे/ गायत्री पवळे : एकेकाळी मंदिर, रंगमंच आणि शास्त्रीय परंपरेपुरते मर्यादित मानले जाणारे नृत्य आज नव्या पिढीच्या अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम बनले आहे. भरतनाट्यम, कथक, ओडिसी यांसारख्या शास्त्रीय नृत्यप्रकारांपासून ते समकालीन, हिप-हॉप आणि फ्युजनपर्यंतचा प्रवास केवळ कलात्मक न राहता सामाजिक बदलांचेही प्रतिबिंब ठरत आहे. शहरांपासून छोट्या गावांपर्यंत नृत्यसंस्कृतीची ही नवी लाट स्पष्टपणे जाणवत असून, कथक आणि भरतनाट्यम शिकणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

 

कथकसारख्या शास्त्रीय नृत्यप्रकारात अंगभूत शिस्त, भाव, मुद्रा आणि कथनपरंपरा यांना आजही तेवढेच महत्त्व आहे. मात्र नव्या पिढीने या परंपरेला जपत त्यात स्वतःची मांडणी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी पारंपरिक रचनांसोबतच सामाजिक विषय, स्त्री-अस्मिता, पर्यावरण, मानसिक आरोग्य आणि आधुनिक जीवनशैली यांसारख्या विषयांवर आधारित नृत्याविष्कार सादर होताना दिसत आहेत. नृत्य शिकण्याकडे आता केवळ छंद म्हणून न पाहता करिअर, फिटनेस आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

शाळा, महाविद्यालये, सांस्कृतिक संस्था आणि खासगी अकॅडमींमध्ये नृत्यवर्गांची संख्या वाढली असून लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक यात सहभागी होत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या बदलाला अधिक गती मिळाली आहे. काही सेकंदांच्या व्हिडिओमधूनही कलाकार आपली ओळख निर्माण करताना दिसत आहेत.

नृत्य हे संस्कृतीचे जिवंत माध्यम

या बदलाचा सर्वात ठळक चेहरा म्हणजे फ्युजन नृत्यप्रकार होय. कथ्थकच्या अर्धमंडलीतून जॅझचा टेम्पो, कथकच्या चक्रांमध्ये समकालीन नृत्याची लय किंवा लोकनृत्यांच्या ठेक्यावर आधुनिक बीट्स—अशा प्रयोगांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परंपरा आणि प्रयोग यांचा हा संगम तरुण कलाकारांना अधिक जवळचा वाटतो. तज्ज्ञांच्या मते, नृत्यसंस्कृतीत होत असलेले हे बदल स्वागतार्ह असले तरी शास्त्रीय नृत्याचा पाया भक्कम राहणे अत्यंत आवश्यक आहे. फ्युजनची लोकप्रियता वाढत असताना शास्त्रीय नृत्याची गहनता, साधना आणि तांत्रिक शिस्त टिकवणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजच्या काळात नृत्य हे केवळ मनोरंजन किंवा रंगमंचावरील सादरीकरण न राहता ओळख, संवाद आणि संस्कृतीचे जिवंत माध्यम बनले आहे. घुंगरांच्या नादात परंपरेची चाहूल आणि नव्या तालात बदलत्या काळाची चाहूल अनुभवायला मिळत आहे.

“पूर्वी कथक नृत्य शिकण्यासाठी संयम अत्यावश्यक मानला जात होता; मात्र सध्याच्या पिढीत तो संयम कमी होताना दिसतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पटकन शिकणे, पटकन परीक्षा देणे आणि प्रमाणपत्र मिळवणे याकडे अधिक कल आहे. शास्त्रीय नृत्य ही साधना असून त्यासाठी चिकाटी आवश्यक असते. त्यामुळे कथकसोबत आजकाल कथक फ्युजनचाही कल वाढताना दिसतो.” — निकिता अविनाश कराळे, कथक शिक्षिका

हे सुद्धा वाचा : दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही! सुनेत्रा पवारांनी दिलं बारामतीकरांना वचन

Web Title: The number of people learning dance appears to be increasing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • DJ Dance
  • Entertainement News
  • pune news

संबंधित बातम्या

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
1

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं
2

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी
3

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
4

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.