Sunetra pawar on Baramati By-election: “दादां शब्दांला जागणारे होते. दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. दादांना साक्षीला ठेवूनच शब्द देते, पार्थ आणि जय हेच माझे कुटुंब नाही. संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे, सर्व बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. कुटुबाच्या विकासासाठी मी झटत राहिल हा माझाही शब्द आहे.’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना शब्द दिला. बारामती पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करायचे आहे. यापूर्वी बारामतीत आज राष्ट्रवादीची सभा पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ” दादांच्या अचानक जाण्याचे अनेक कार्यकर्त्यांचे मनोबल खचलं पण काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचा जनता दरबार यापुढेही सुरू राहिलं. त्यांच्या जाण्याचे अस्वस्थतेचं वातावरण होतं. आजही तसेच वातावरण आहे. व्यापारी, शेतकरी, कामगार महिला. तरूण, सगळेच हवालदिल झाले होतं आपण आजही मी ठामपणे सांगते, बारामतीचा विकास तितक्याच वेगाने सुरू राहिल. बाजारपेठेतील उलाढाल गतीमान राहण्यासाठी नवीन प्रकल्प आणि गुंतवणूक बारामतीत येण्यासाठी मी सर्व पातळीवर लक्ष देईन. दादांचा प्रशासनावर आदरयुतक्त दरारा होता. त्यामुळे शासकीय कामे वेळेत होत होती. ती शिस्त यापुढेही कायम राहिल, प्रशासनावर मजबूत नियंत्रण राहील आणि सामान्य लोकांची काम वेळेत होतील याची खात्री बाळगा.”
Amravati News : 102 टक्के पाऊस; तरीही ‘या’ जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट; वाढते तापमान आणि घटते भूजल
दादांच्या नंतर महिला आणि मुलीच्या सुरक्षिततेबाबत सर्वांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण दादा असताना सुरक्षिततेबाबत बारामतीची जी ओळख निर्माण झाली होती, ती तशीच कायम राहिल याची खात्री बळगा. शहरात गुंडगिरी, खंडणीखोरांना बिल्कूल थारा मिळणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाला योग्य त्या सुचना दिल्या जातील. निरा कालवा -डावा हा बारामतीच्या शेतजमीनीचा जीव आहे शेतकऱ्यांना यापुढे नियमित पाणी मिळत जाईल. बारामती सह राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे होतील. आता विकास थांबणार नाही.
“अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, मात्र त्यांचा विकासाचा विचार मी पुढे घेऊन जाईल. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजितदादांची पत्नी म्हणून हे राज्य सांभाळण्याची ताकद मला नक्कीच मिळेल,” असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, आता निवडणूक ही माझी नसून बारामतीकरांती झाली आहे, बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे, हे मी सांगायला नको. आता बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हाती घेतली आहे. आजपर्यंत तुम्ही अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही थोडी अधिक मला जास्त साथ द्याल, असा विश्वास आहे, असं सुनेत्रा पवारांनी सांगितले.
गारगाई प्रकल्पात २६८.८० कोटी रुपयांची झाली बचत! कंत्राटदाराने दरात केली ७ टक्क्यांनी कपात
जितदादांनी बारामतीचा जो विकास केला आहे, तो यापुढेही अविरत सुरू राहील. दादांचा ‘जनता दरबार’ देखील नियमित सुरू राहील, जेणेकरून सामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. “केवळ जय आणि पार्थ हेच माझे कुटुंब नाही, तर तुम्ही सर्वजण माझे कुटुंब आहात. या कुटुंबातील एकालाही मी वाऱ्यावर सोडणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना आणि मतदारांना साद घातली. साहेब आणि अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला राजकीय आणि सामाजिक अनुभवाचा वारसा आपल्याला जनसेवेसाठी बळ देईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.






