Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Trailer Release Date: अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ शुभ ब्रह्ममुहूर्तावर होणार ‘रामायण’चा ट्रेलर रिलीज; तारीख आणि वेळ जाहीर

Ramayana Trailer Release Date: रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून निर्माते नमित मल्होत्रा यांनी ट्रेलरच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 29, 2026 | 09:43 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ramayana Trailer Release Date:दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित ‘रामायण पार्ट १’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), साई पल्लवी  (Sai Pallavi) आणि यश (Yash)यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून निर्माते नमित मल्होत्रा यांनी ट्रेलरच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केली आहे.

मूळ नियोजनानुसार ‘रामायण’ चा ट्रेलर २४ जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, काही विशेष स्क्रीनिंग आणि इतर कार्यक्रमांमुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. आता निर्माते नमित मल्होत्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रेलर ३० जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे.

नमित मल्होत्रा यांनी शेअर केलेल्या पोस्टरवर, “शुभ ब्रह्ममुहूर्तावर, गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी पहाटे ४:१५ वाजता ‘रामायण’च्या ट्रेलरसह जगभरात नव्या सकाळचे स्वागत करू,” असा संदेश देण्यात आला आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने, “माझं मन तोडू नका, संपूर्ण जग थक्क होईल असं काहीतरी दाखवा… जय बजरंगबली,” अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या एका युजरने, “पहाटे ४:१५ वाजता उठावं लागणार,” असे लिहिले. आणखी एका चाहत्याने, “आता पुन्हा निराश करू नका, या ट्रेलरची खूप दिवसांपासून वाट पाहतोय,” अशी भावना व्यक्त केली.

दरम्यान, ट्रेलरचे प्रदर्शन पुढे ढकलल्यामुळे काही दिवसांपूर्वी चाहते नाराज झाले होते. सोशल मीडियावर त्यांनी निर्मात्यांवर टीकाही केली होती. मात्र, आता अधिकृत रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर चाहत्यांचा उत्साह पुन्हा वाढला आहे.

वैभव आणि पूजाची जोडी पुन्हा झळकणार! ‘भेटली तू पुन्हा’ चा सिक्वल २०२७ मध्ये येणार; चाहत्यांना आनंद आवरेना

याचदरम्यान, ‘रामायण पार्ट १’ च्या ट्रेलरमधील काही क्लिप्स सोशल मीडियावर लीक झाल्याची चर्चा रंगली आहे. त्या क्लिप्सवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असल्या, तरी अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी माता सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याने या चित्रपटाविषयीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘Kiss करण्याचा प्रयत्न…’, मामानेच केला लैंगिक छळ’; टीव्ही अभिनेत्रीने सांगितला बालपणीचा धक्कादायक अनुभव`

Web Title: The wait is finally over ramayana trailer to release during this auspicious brahma muhurta date and time announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • bollywood movies
  • ranbir kapoor
  • Sai Pallavi

संबंधित बातम्या

Love And War Update: भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’बाबत सर्वात मोठी अपडेट समोर! रणबीर-आलियाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला
1

Love And War Update: भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’बाबत सर्वात मोठी अपडेट समोर! रणबीर-आलियाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला

रामायण सिनेमाच्या टीमने चाहत्यांना वाटले सोन्याचे शंख? व्हायरल व्हिडिओने वेधलं लक्ष; सिनेमाची होतेय जोरदार चर्चा
2

रामायण सिनेमाच्या टीमने चाहत्यांना वाटले सोन्याचे शंख? व्हायरल व्हिडिओने वेधलं लक्ष; सिनेमाची होतेय जोरदार चर्चा

Ramayana Trailer: ‘रामायणम्’चा ट्रेलर लांबणीवर; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमित मल्होत्रांची मोठी घोषणा?
3

Ramayana Trailer: ‘रामायणम्’चा ट्रेलर लांबणीवर; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमित मल्होत्रांची मोठी घोषणा?

प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला ‘इंद्रजाल’? श्रद्धेचा अपमान केल्याच्या आरोपांवर दिग्दर्शकांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “आधी चित्रपट..”
4

प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला ‘इंद्रजाल’? श्रद्धेचा अपमान केल्याच्या आरोपांवर दिग्दर्शकांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “आधी चित्रपट..”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.