(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बरसातें’ आणि ‘बडे अच्छे लगते हैं २’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेल्या शिवांगीने सांगितले की, तिच्या वडिलांच्या व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले होते. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की कुटुंबाला जगण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्या काळानंतर घराची जबाबदारी तिने स्वतःच्या खांद्यावर घेतल्याचेही तिने सांगितले.
मात्र, यापेक्षाही धक्कादायक खुलासा करताना शिवांगी भावूक झाली. तिने सांगितले की, लहानपणी तिच्या आईच्या दत्तक भावाने म्हणजेच तिच्या मामाने तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला अभिनय शिकवण्याच्या आणि गाडी चालवण्याच्या बहाण्याने तो तिच्याशी अयोग्य वर्तन करत असल्याचे तिला जाणवले. त्यावेळी नेमके काय घडत आहे, हे लहान असल्याने तिला समजत नव्हते, असे तिने सांगितले.
Shivangi’s secrets💔
Shivangi you are so strong we are so proud of you🥺#ShivangiJoshi #Lockupp2 pic.twitter.com/mynnm9GEcL — ᴛɪᴛʟɪ ɢɪʀʟ🦋 (@Dlittledesire) July 28, 2026
शिवांगीच्या म्हणण्यानुसार, मुंबईत अभिनयासाठी जाण्यापूर्वी तिच्या मामाने तिला ‘अभिनयात अशा गोष्टी कराव्याच लागतात’ असे सांगत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अभिनयाच्या नावाखाली तिला जबरदस्तीने kiss करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यावेळी तिने धाडस दाखवत त्याला विरोध केला आणि त्याच्या चेहऱ्यावर मारल्याचे तिने सांगितले.
त्यानंतर तो संतापला आणि तिला इजा करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिचे आई-वडील घरी आले. घडलेला प्रकार समजल्यानंतर त्यांनी संबंधित नातेवाईकाला घराबाहेर काढत त्याचा जाब विचारला, असेही शिवांगीने सांगितले.






