Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणिकबाग नाट्यगृह अद्याप प्रतीक्षेत; 22 कोटी खर्चूनही दहा वर्षापासून काम अपूर्णच

सिंहगड रस्ता परिसरातील नागरिक, कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा माणिकबाग येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह प्रकल्प अद्याप पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 09, 2026 | 01:49 PM
माणिकबाग नाट्यगृह अद्याप प्रतीक्षेत; 22 कोटी खर्चूनही दहा वर्षापासून काम अपूर्णच

माणिकबाग नाट्यगृह अद्याप प्रतीक्षेत; 22 कोटी खर्चूनही दहा वर्षापासून काम अपूर्णच

Follow Us
Follow Us:

पुणे/गायत्री पवळे : सिंहगड रस्ता परिसरातील नागरिक, कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा माणिकबाग येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह प्रकल्प अद्याप पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. २०१६ पासून तब्बल दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या प्रकल्पाबाबत वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडून विविध आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात नाट्यगृहाचे काम अद्याप संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे.

 

२०१७ मध्ये या नाट्यगृहाच्या कामास सुरुवात झाली. सुरुवातीला १५ कोटी रुपयांचा आराखडा असलेल्या या प्रकल्पाचा खर्च नंतर वाढत गेला. आजपर्यंत सुमारे २२ कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. २०२४ मध्ये तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दीड वर्षांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कलाकार, नाट्यव्यवस्थापक आणि स्थानिक नागरिकांच्या सूचनांनुसार काही बदलही आराखड्यात करण्यात आले. या नाट्यगृहात ८०० हून अधिक आसनक्षमता, दोन मजली पार्किंग, ग्रीनरूम, कला दालन, रॅम्प, लिफ्ट, प्रशस्त प्रवेशद्वार अशा सुविधा प्रस्तावित आहेत.

सिंहगड रस्ता परिसरात स्वतंत्र मोठे नाट्यगृह नसल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कोथरूड किंवा शहराच्या मध्यवर्ती भागावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या नाट्यगृहाकडून परिसरातील कलाकारांना मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र प्रत्यक्षात आजही इमारतीचे अनेक अंतर्गत काम अपूर्ण असल्याचे दिसून येते. विद्युत यंत्रणा, ध्वनिसंस्था, रंगमंच उभारणी, अंतर्गत सजावट आणि अग्निसुरक्षा यांसारखी महत्त्वाची कामे अद्याप बाकी असल्याचे सांगितले जाते. काही महिन्यांपासून कामाचा वेग मंदावल्याचीही चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी

दरम्यान, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकांनी प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन सध्या दिलेले आहे. आता प्रेक्षकांना डिसेंबरची प्रतिक्षा आहे. “प्रत्येक वर्षी नवे आश्वासन दिले जाते; पण उद्घाटनाची तारीख पुढेच ढकलली जाते,” अशी प्रतिक्रिया काही कलाकारांनी व्यक्त केली. परिसरातील नागरिकांनीही या प्रकल्पाला ‘रखडलेले सांस्कृतिक स्वप्न’ अशी उपमा दिली आहे.

स्ट्रक्चर उभे केले म्हणजे ८०% काम होत नाही. सध्या त्या वस्तूचे बरेच काम बाकी आहे. साधारण १० वर्षे झालेली आहेत हे काम सुरु होऊन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या वस्तूचे भूमीपूजन झाले होते. सध्या हे काम खूप संथ गतीने सुरु आहे. आता काम सुरु केले तरच ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्या भागातील लोकांना खूप दूर जावे लागत आहे. ही कामे पूर्ण झाली नसताना बालगंधर्व पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ही सर्व कामे लवकरात लवकर करून देण्याची विनंती सर्व कलाकारांकडून करत आहे. -सिद्धेश्वर झाडबुके, अभिनेते.

काम अंतिम टप्प्यात असल्याचा प्रशासनाकडून दावा

महापालिका प्रशासनाकडून मात्र काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करण्यात येत आहे. आवश्यक निधी उपलब्ध करून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुण्याची सांस्कृतिक ओळख जपणाऱ्या शहरात नाट्यगृहांसारखे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असताना, माणिकबाग नाट्यगृहाचा पडदा अजूनही उघडलेला नाही. त्यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील नागरिक आता केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष उद्घाटनाच्या तारखेची वाट पाहत आहेत.

“पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत नाट्यगृहांची कामे 10-15 वर्ष रखडणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. काही दिवसांपूर्वी महापौर आणि आयुक्त यांनी संयुक्त पाहणी दौरा केला, मात्र त्यातून कोणताही ठोस निर्णय समोर आला नाही. कोणताही आयुक्त आला तरी सांस्कृतिक विषयांबाबतची उदासीनता कायम दिसून येते. विशेष म्हणजे हे नाट्यगृह महापौरांच्या प्रभागात असल्याने आता या प्रकल्पाबाबत महापौर काय भूमिका घेतात, याकडे सिंहगड रोड परिसरातील नागरिक आणि कलाकारांचे लक्ष लागले आहे. रखडलेले सांस्कृतिक प्रकल्प तातडीने पूर्ण करून कलाकारांना दर्जेदार सुविधा देणे ही आजची गरज आहे.” — बाबासाहेब पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग.

Web Title: The work on the theater at manikbagh in the sinhagad road area has not been completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Naval Kishore Ram
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.