Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tujhya Aayla Movie: ‘तुझ्या आयला’चं मोशन पोस्टर प्रदर्शित; टॅगलाइनने वेधलं लक्ष, सुजय डहाकेच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता वाढली

Tujhya Aayla Movie: सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला’ या मराठी चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित झालं आहे. ‘शिवी नाय खेळाचं नाव हाय ते’ टॅगलाइन चर्चेत असून, चित्रपट २५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 20, 2026 | 04:00 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Tujhya Aayla Movie:  पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्या प्रादेशिक चित्रपटांच्या धोरणात्मक भागीदारीअंतर्गत निर्मिती होणाऱ्या पहिल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आयला’ या चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. आगळंवेगळं शीर्षक आणि वेगळ्या विषयामुळे हा चित्रपट आधीपासूनच चर्चेत आहे.

२५ सप्टेंबरला महाराष्ट्रभर होणार प्रदर्शित

पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्स यांच्यात गेल्या आठवड्यात धोरणात्मक भागीदारीची घोषणा करण्यात आली होती. या भागीदारीअंतर्गत प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘तुझ्या आयला’ हा पहिला चित्रपट ठरला आहे.

‘शाळा’ आणि ‘श्यामची आई’ यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे सुजय डहाके या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. २५ सप्टेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

‘तुझ्या आयला’ची कथा नेमकी काय?

‘तुझ्या आयला’ हा शाब्दिक हिंसा आणि त्याचा मुलांच्या कोवळ्या मनावर होणारा परिणाम यावर भाष्य करणारा कमिंग-ऑफ-एज चित्रपट आहे. ट्रोलिंग आणि शाब्दिक हिंसेच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा एका जिज्ञासू १२ वर्षांच्या मुलाभोवती फिरते.

आईलाच अनेकदा शाब्दिक हिंसेचं केंद्र का बनवलं जातं, याचा शोध घेण्यासाठी हा मुलगा एका अनोख्या प्रवासाला निघतो. खेळकर आणि विचार करायला लावणाऱ्या शैलीतून चित्रपटात दैनंदिन आयुष्यात शाब्दिक हिंसा कशी सामान्य होत जाते आणि त्याचा मुलांवर नेमका काय परिणाम होतो, याचा वेध घेण्यात आला आहे.

‘शिवी नाय खेळाचं नाव हाय ते’ टॅगलाइन चर्चेत

चित्रपटाची ‘शिवी नाय खेळाचं नाव हाय ते’ ही टॅगलाइनही लक्ष वेधून घेत आहे. या टॅगलाइनमधून चित्रपटाचा मध्यवर्ती विषय स्पष्टपणे समोर येतो. मोशन पोस्टरमधूनही चित्रपटाच्या वेगळ्या विश्वाची झलक पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडींसह बालकलाकार

‘तुझ्या आयला’मध्ये राजश्री देशपांडे, रोहिणी हट्टंगडी, संभाजी भगत, अभिजित थिटे, सोहम बाबर आणि अभिषेक झेंडे यांच्यासह अनेक गुणी बालकलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Shweta Tiwari: ‘तुकाराम मुंढेजी… तुम्ही कुठे आहात?’ श्वेता तिवारीच्या घरी थंड पेयासोबत आलं चक्क जिवंत झुरळ; व्हिडीओ व्हायरल

पॅनोरमा स्टुडिओज, कल्ट डिजिटल आणि प्रकाश फिल्म्सची निर्मिती

पॅनोरमा स्टुडिओजच्या वतीने कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक आणि मुरलीधर छतवानी, कल्ट डिजिटलच्या वतीने सुनील जैन, आदित्य जोशी आणि मोहित अरोरा, तर प्रकाश फिल्म्सच्या वतीने राजेश सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुशांत वेंगुर्लेकर आणि मेघना प्रमाणिक सहनिर्माते आहेत.

आगळावेगळा विषय, बालविश्वाचा संवेदनशील वेध आणि सुजय डहाके यांची वैशिष्ट्यपूर्ण कथनशैली यामुळे ‘तुझ्या आयला’ या भागीदारीतील महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. आता २५ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस किती उतरतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज

Web Title: Tujhya aayla motion poster sujay dahake marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Manoj Bajpayee: महात्मा गांधींच्या आयुष्यातील ते २१ दिवस! मनोज बाजपेयींच्या नव्या भूमिकेने वाढवली सिनेमाची उत्सुकता
1

Manoj Bajpayee: महात्मा गांधींच्या आयुष्यातील ते २१ दिवस! मनोज बाजपेयींच्या नव्या भूमिकेने वाढवली सिनेमाची उत्सुकता

Pushkar Jog: पुष्कर जोग पुन्हा थिरकवणार! ‘हाये रे हाये’ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसला डान्सिंग स्टारचा हटके अंदाज
2

Pushkar Jog: पुष्कर जोग पुन्हा थिरकवणार! ‘हाये रे हाये’ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसला डान्सिंग स्टारचा हटके अंदाज

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज
3

Lalit Prabhakar-Prajakta Mali: १३ वर्षांनी पुन्हा जुळणार ललित-प्राजक्ताची ‘रेशीमगाठ’; ‘शुभ मंगलम जोडी दंगलम’चा टीझर रिलीज

Singer Mukesh Ji : गायक मुकेश यांच्या संगीत वारशासाठी विशेष समिती; नवोदित कलाकारांना मिळणार व्यासपीठ
4

Singer Mukesh Ji : गायक मुकेश यांच्या संगीत वारशासाठी विशेष समिती; नवोदित कलाकारांना मिळणार व्यासपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.