Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Twinkle Khanna: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा ट्विंकल खन्नावर परिणाम; डिंपल कपाडियासोबत घरातच बनवतेय पनीर

Twinkle Khanna: नकली पनीरच्या चर्चेनंतर ट्विंकल खन्ना आणि डिंपल कपाडिया घरच्या घरी पनीर बनवत आहेत. तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर ट्विंकलने मिश्कील भाष्य केलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 31, 2026 | 08:45 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे ट्विंकल खन्ना सावध
  • ट्विंकल खन्ना-डिंपल कपाडिया बनवतायत घरच्या घरी पनीर
  • रेस्टॉरंटमध्ये पनीर ऑर्डर करण्याआधी ट्विंकल हे विचारते
Twinkle Khanna : महाराष्ट्राचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडक कारवाईसाठी ओळखले जातात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांसह सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंट्सविरोधात कठोर पावले उचलली आहेत. त्यांच्या या धडक कारवाईला कलाकार मंडळींकडूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. मध्यंतरी त्यांनी भेसळयुक्त पनीरच्या उत्पादनाविरोधातही मोठी कारवाई केली होती. त्यांच्या या कारवाईनंतर आता अभिनेत्री ट्विंकल खन्नानेही आपल्या अनुभवाबद्दल एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. ट्विंकल आणि तिची आई डिंपल कपाडिया यांनी बाहेर पनीर खाण्याऐवजी आता घरच्या घरी पनीर बनवण्यास सुरुवात केली आहे.

ट्विंकल खन्नाने ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील आपल्या कॉलममध्ये तुकाराम मुंढे यांच्या कारवाईवर मिश्कील भाष्य केलं आहे. यामध्ये तिने अन्नातील भेसळ, पनीरची गुणवत्ता आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांबाबत निर्माण झालेल्या भीतीवर विनोदी शैलीत भाष्य केलं.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईची ट्विंकलने केली चर्चा

ट्विंकलने आपल्या कॉलममध्ये महाराष्ट्र FDAच्या कारवाईचा उल्लेख करताना सांगितलं की, तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर तपासण्या आणि छापेमारी केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक रेस्टॉरंट्सवर कारवाई करण्यात आली असून काही ठिकाणी परवानेही रद्द करण्यात आले आहेत.

ट्विंकलने आपल्या नेहमीच्या मिश्कील शैलीत मुंढे यांच्या कारवाईचा संदर्भ देत लिहिलं की, ते जिथे जातात तिथे मोठ्या लोकांची ‘मुंडी’ पडते.

घरच्या घरी पनीर बनवण्यास सुरुवात

नकली पनीरच्या चर्चेनंतर आपण आणि आपली आई डिंपल कपाडिया यांनी घरच्या घरी पनीर बनवण्यास सुरुवात केल्याचं ट्विंकलने सांगितलं.

तिने लिहिलं की, त्यांच्या घरी एक लिटर दुधापासून डिंपल २५० ग्रॅम पनीर बनवतात, तर ट्विंकलला त्याच प्रमाणात दुधापासून केवळ १८० ग्रॅम पनीर मिळतं. आता त्यांच्या दोघींमध्ये पनीरच्या प्रमाणासोबतच त्याच्या चवीवरूनही मजेशीर स्पर्धा सुरू झाली आहे.

‘पनीर जास्त पांढरं कोणाचं?’; ट्विंकलचा मिश्कील टोला

ट्विंकलने पुढे लिहिताना या स्पर्धेचा रंग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली. उद्या आईसोबत कोणाचं पनीर जास्त पांढरं आहे, यावरूनही वाद सुरू होऊ शकतो, असं तिने विनोदी अंदाजात म्हटलं. याच संदर्भात तिने खाद्यपदार्थांमध्ये चुकीच्या पदार्थांचा वापर केल्याने होणाऱ्या धोक्यांवरही भाष्य केलं.

तिने बिहारमधील नालंदा जिल्ह्यात मीठाऐवजी डिटर्जंटचा वापर झाल्याने काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याच्या घटनेचाही उल्लेख केला.

Is it really so rare to see a government official simply doing his job that it has become news? https://t.co/AGG7DOUBDX pic.twitter.com/F4ZYwrDXN1 — Twinkle Khanna (@mrsfunnybones) August 30, 2026

 

रेस्टॉरंटमध्येही पनीर ऑर्डर करण्यापूर्वी विचारणार मुंढेंनी तपासलंय का?

ट्विंकलने आपल्या कॉलममध्ये एक काल्पनिक प्रसंगही रंगवला आहे. ती मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये जाते आणि तंदुरी ब्रोकोली तसेच चिकन टिक्का ऑर्डर करते. त्यानंतर पनीर टिक्का ऑर्डर करण्यापूर्वी ती वेटरला रेस्टॉरंटची तुकाराम मुंढे यांनी तपासणी केली आहे का, असा प्रश्न विचारते.

वेटरने ‘हो, गेल्या आठवड्यात तपासणी झाली आणि आम्ही पास झालो,’ असं सांगितल्यानंतरच ती पनीर टिक्का ऑर्डर करण्यास तयार होते, असा मजेशीर प्रसंग ट्विंकलने सांगितला आहे

The Paradise Song: ‘द पॅराडाईज’चं दुसरं गाणं ‘येशा नागुला’ रिलीज; नानी-कीर्तीच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

‘मुंढेंची मार्टिनी’ नावाचीही कल्पना

ट्विंकलने पुढे आणखी मजेशीर किस्सा सांगितला आहे. पनीरचा एक तुकडा टूथपिकवर घेतल्यानंतर तो थेट तिच्या मार्टिनीमध्ये पडतो. त्यानंतर ती या प्रसंगाला तुकाराम मुंढेंच्या नावाने टोस्ट करण्याची कल्पना करते.

ट्विंकलने या काल्पनिक ड्रिंकला ‘मुंढेंची मार्टिनी’ असं नाव दिलं आहे. जिन, वर्मुथ, ऑलिव्ह आणि पनीर यांचं हे भन्नाट मिश्रण असल्याचं तिने मिश्कीलपणे लिहिलं आहे.

ट्विंकल खन्नाच्या या विनोदी लेखातून अन्नातील भेसळ आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत सध्या निर्माण झालेली चिंता वेगळ्या पद्धतीने समोर आली आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा संदर्भ घेत तिने आपल्या आणि आई डिंपल कपाडियाच्या घरगुती पनीर बनवण्याच्या अनुभवाला मजेशीर ट्विस्ट दिला आहे.

Mirzapur: The Movie: ‘मिर्झापूर द मूव्हीला मिळालं ‘हे’ सर्टिफिकेट; पंकज त्रिपाठीच्या सिनेमाचा रनटाइम किती? जाणून घ्या

Web Title: Twinkle khanna tukaram mundhe dimple kapadia paneer news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Tukaram Mundhe
  • Twinkle Khanna

संबंधित बातम्या

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर मंत्र्यांची मोठी घोषणा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय
1

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर मंत्र्यांची मोठी घोषणा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय

Tukaram Mundhe on Maharashtra Drought : दुष्काळात ‘या’ व्यवसायाची मोठी संधी, तुकाराम मुंढेंनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र
2

Tukaram Mundhe on Maharashtra Drought : दुष्काळात ‘या’ व्यवसायाची मोठी संधी, तुकाराम मुंढेंनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध
3

FDA Raid: कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध

Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन
4

Tukaram Mundhe Suspend FDA Officers: सुपारी घोटाळ्यात तुकाराम मुंडेंचा तडाखा!; एफडीएच्या ५ अधिकाऱ्यांचे निलंबन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.