Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम मुंढेंच्या FDA कारवाईवर मंत्र्यांची मोठी घोषणा; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? मुख्यमंत्री घेणार निर्णय

महाराष्ट्रात FDA च्या कारवायांवरून घडामोडींना वेग आला आहे. कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई केल्यास दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असा इशारा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला.

  • By विवेक
Updated On: Oct 17, 2026 | 09:54 PM
Tukaram Mundhe

Tukaram Mundhe

Follow Us
Follow Us:
  • कार्यक्षेत्राबाहेर कारवाई केल्यास FDA अधिकाऱ्यांवर निलंबन
  • मुख्यमंत्री घेणार कारवाईचा निर्णय
  • दोन दिवसांत ४८ लाखांचा संशयास्पद अन्नसाठा उघड
 

महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) कारवायांमुळे सध्या व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त, खराब आणि नियमबाह्य अन्नपदार्थांविरोधात कारवाई सुरू असतानाच, काही अधिकारी आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. नियमांच्या बाहेर जाऊन कारवाई केल्याचे सिद्ध झाल्यास दोषींवर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्षेत्राबाहेर कारवाई केल्यास निलंबन

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यात भेसळयुक्त आणि नियमबाह्य अन्नपदार्थांविरोधात कारवाई केली जात आहे. दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहिमांनाही वेग आला आहे. मात्र, काही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई होत असल्याचा आरोप आस्थापनाधारकांकडून करण्यात येत आहे.

Tukaram Mundhe on Maharashtra Drought : दुष्काळात ‘या’ व्यवसायाची मोठी संधी, तुकाराम मुंढेंनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. संबंधित प्रकरणात पाच ते सात अधिकारी किंवा अन्य व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री घेणार कारवाईचा निर्णय

FDA अधिकाऱ्यांच्या कारवाईसंदर्भातील प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याचे झिरवाळ यांनी सांगितले. दोषींवर कोणती कारवाई करायची, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. आवश्यक असल्यास संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबनही केले जाऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

दोन दिवसांपूर्वी FDA मधील पाच अधिकाऱ्यांवरील निलंबनाच्या कारवाईवरूनही चर्चा रंगली होती. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सुपारीच्या ट्रकवर करण्यात आलेल्या कारवाईत भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याची माहिती आहे.

दोन दिवसांत ४८ लाखांचा संशयास्पद अन्नसाठा उघड

दुसरीकडे, अन्न व औषध प्रशासनाने १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी कोकण व पुणे विभागात विशेष शोधमोहीम राबवली. या मोहिमेत मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थांची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली त्यांची पुन्हा खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या साखळीचा पर्दाफाश झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

या कारवाईदरम्यान एकूण ४८ लाख ८ हजार ९२४ रुपये किमतीचा संशयास्पद व खराब अन्नसाठा आढळून आला. भिवंडी, अंबरनाथ आणि खेड तालुक्यातील चाकण-निघोजे परिसरातील मोठ्या कंपन्यांच्या पाच गोदामांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. तसेच, दोन विनापरवाना आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

एकीकडे अन्नसुरक्षेच्या दृष्टीने FDA कडून कारवाई सुरू असताना, दुसरीकडे अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

 शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कोणता इशारा दिला?

    Ans: FDA च्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन कारवाई केल्याचे संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनासह कारवाई होऊ शकते, असा इशारा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला.

  • Que: FDA अधिकाऱ्यांवरील कारवाईचा निर्णय कोण घेणार आहे?

    Ans: या प्रकरणात कोणती कारवाई करायची, याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

  • Que: FDA च्या विशेष मोहिमेत किती रुपयांचा अन्नसाठा आढळला?

    Ans: १४ आणि १५ ऑक्टोबर रोजी कोकण व पुणे विभागात राबवलेल्या विशेष मोहिमेत ४८ लाख ८ हजार ९२४ रुपये किमतीचा संशयास्पद व खराब अन्नसाठा आढळला.

Web Title: Fda officers suspension warning narhari zirwal vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • FDA
  • Maharashtra Government
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe on Maharashtra Drought : दुष्काळात ‘या’ व्यवसायाची मोठी संधी, तुकाराम मुंढेंनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र
1

Tukaram Mundhe on Maharashtra Drought : दुष्काळात ‘या’ व्यवसायाची मोठी संधी, तुकाराम मुंढेंनी दिला शेतकऱ्यांना कानमंत्र

Loose Spice Ban in Maharashtra : सुट्यामसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध! लहान विक्रीत्यांच्या तोटा, सर्वसामान्यासमोर नवा प्रश्न
2

Loose Spice Ban in Maharashtra : सुट्यामसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध! लहान विक्रीत्यांच्या तोटा, सर्वसामान्यासमोर नवा प्रश्न

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई
3

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; डॉमिनोजच्या ६ आउटलेट्ससह ८ ठिकाणी FDA ची कारवाई

Cancer: कॅन्सरच्या महागड्या तपासणीचा खर्च वाचणार! महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
4

Cancer: कॅन्सरच्या महागड्या तपासणीचा खर्च वाचणार! महाराष्ट्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.