Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी अभिनेता आहे, नेता नाही’, Sonam Wangchuk यांच्या मुद्द्यावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत; नेटकऱ्यांनी घेतला समाचार

Vivek Oberoi On Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता कलाकार मंडळींकडून पाठिंबा मिळत असून कलाकारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली आहे. पण विवेक ओबेरॉयने मात्र या प्रकरणी भाष्य करणे टाळले आहे. यामुळे आता नेटकऱ्यांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 18, 2026 | 01:01 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Vivek Oberoi On Sonam Wangchuk : सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता कलाकार मंडळींकडून पाठिंबा मिळत आहे.सोनम वांगचुक यांनी २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या विविध मागण्यांवर सरकारने चर्चा करावी, अशी त्यांची भूमिका आहे. या आंदोलनाला अनेक क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून काही कलाकारांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली आहे. पण विवेक ओबेरॉयने मात्र या प्रकरणी भाष्य करणे टाळले आहे. विवेकने म्हटले आहे की, तो एक अभिनेता आहे, राजकारणी नाही. त्याचा विश्वास आहे की एका सुदृढ लोकशाहीत लोकांना त्यांच्या चिंता व्यक्त करण्याची परवानगी दिली पाहिजे.

माध्यमांशी संवाद साधताना विवेक ओबेरॉयला सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाबद्दल विचारण्यात आले. ते गेल्या २० दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे उपोषणावर आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी वांगचुक यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणीही केली आहे. याबद्दल विचारले असता, विवेकने भाष्य करण्याऐवजी, स्वतःला एक निरीक्षक म्हटले, जो आपल्या सभोवतालच्या घटनांमधून सतत शिकत असतो.

विवेक ओबेरॉय म्हणाला, “मी एक अभिनेता आहे, राजकारणी नाही. त्यामुळे मी राजकीय बाबींकडे लक्ष देत नाही. आम्ही निरीक्षण करतो आणि शिकतो. आयुष्यात पाहण्यासारखं आणि शिकण्यासारखं खूप काही आहे.”

जेव्हा विवेक ओबेरॉय ला विचारले गेले की त्याने निषेधांबद्दल काय पाहिले आणि शिकले, तो म्हणाला, ‘मी पाहिले की ही देखील एक नवीन गोष्ट होती आणि मला वाटते की निरोगी लोकशाहीमध्ये प्रत्येक आवाजाला स्थान मिळते. या लोकांनी आपला आवाज व्यक्त केला असेल तर ते सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे.

Vivek Oberoi Shuts Down Question On Sonam Wangchuk’s Protest. I am an actor, not a politician. I don’t pay attention to political things, I just watch and observe them. pic.twitter.com/juIraNBlkn — Filmy_Duniya (@AyyanPanda) July 16, 2026


अभिनेत्याच्या या प्रतिक्रियेवर आता सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. त्याच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लिहिले, ‘सरजी, कृपया कधीतरी अभिनयाच्या क्षेत्रातून बाहेर या, नाहीतर देशाच्या भल्यासाठी कोण लढेल?’

Shalmali Kholgade : गायिकेने सरकारवर साधला निशाणा; ‘हे प्रतिनिधी की मालक?’ केला थेट सवाल

विवेक ओबेरॉयने आंदोलनांना पाठिंबाही दिला नाही आणि उघडपणे विरोधही केला नाही. त्याने आपली मते लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यापुरतीच मर्यादित ठेवली. दरम्यान, प्रकाश राज, नसीरुद्दीन शाह, झीनत अमान, अभय देओल, अतुल कुलकर्णी, सयाजी शिंदे, सोनाक्षी सिन्हा, ‘3 इडियट्स’चे ओमी वैद्य, विशाल दादलानी, कुनिका सदानंद आणि देवोलीना भट्टाचार्जी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिला आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे.

Aamir Khan : अभिजीत दिपकेने अभिनेत्यावर साधला निशाणा! म्हणाला ‘ज्या माणसाच्या नावावर इतके पैसे…’

Web Title: Vivek oberois statement sparks buzz on social media netizens slam the actor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 09:19 AM

Topics:  

  • delhi
  • Sonam Wangchuk
  • vivek oberoi

संबंधित बातम्या

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन
1

DUSU Election Result 2026: DUSU निवडणुकीत ABVPचे यश; अध्यक्ष, सचिव अन् संयुक्त सचिवपद जिंकले, उपाध्यक्षपदी दीपांशु शौकीन

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
2

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार अन् नंतर…

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.