
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित ‘आर्टिकल ३७०’मध्ये यामी गौतमने गुप्तचर अधिकारी झुनी हक्सरची भूमिका साकारली होती. या भूमिकेतील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना यामीच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. तिच्यासाठी हा क्षण खास ठरला, कारण अभिनयाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
या पुरस्कार सोहळ्याला यामीसोबत तिचा पती आणि दिग्दर्शक आदित्य धरदेखील उपस्थित होते. यामीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळत असताना आदित्य धर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान पाहायला मिळाला.
यामीला पुरस्कार मिळाल्याचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पत्नीला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळताना आदित्य धर भावूक झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
‘आर्टिकल ३७०’लाही मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
यामी गौतमच्या अभिनयासोबतच ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी यामी आणि संपूर्ण टीमसाठी हा सोहळा विशेष ठरला.
यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार यामी गौतमला प्रदान करण्यात आला. तिच्या कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
‘आर्टिकल ३७०’मध्ये यामीने झुनी हक्सर नावाच्या एनआयए अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. काश्मीरमध्ये एका गुप्त मोहिमेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्याभोवती चित्रपटाची कथा फिरते.
झुनी हक्सर हे काल्पनिक पात्र असलं तरी चित्रपटाची कथा ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रद्द करण्याच्या आसपासच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. गुप्तचर कारवाया, राजकीय निर्णय आणि मोठ्या सुरक्षा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा पुढे जाते. या संपूर्ण कथेत यामीचं पात्र महत्त्वाची भूमिका बजावतं.