कोरिओग्राफर अवी पायल यांच्या नव्या प्रोजेक्ट्सची सोशल मीडियावर हवा ( सौजन्य - सोशल मीडिया )
कलाकाराला केवळ डान्स शिकवण्यापेक्षा त्याचा आत्मविश्वास, स्टेज प्रेझेन्स, बॉडी लँग्वेज आणि परफॉर्मन्स स्किल्स विकसित करून त्याच्यातील कलाकार घडवण्यावर अवी पायल यांचा विशेष भर आहे. अलीकडेच त्यांनी कोरिओग्राफ केलेल्या एका लोकप्रिय म्युझिक प्रोजेक्टची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. बाप्पा माझा या गाण्यासाठी सुरुवातीला तयार केलेली कोरिओग्राफी प्रत्यक्ष शूटदरम्यान कलाकारांच्या परफॉर्मन्सनुसार काही प्रमाणात बदलावी लागली.
अत्यंत कमी वेळेत ऑन-द-स्पॉट बदल करत गाण्याची एनर्जी आणि मूळ भाव कायम ठेवण्याचे आव्हान अवी पायल यांनी यशस्वीपणे पेलले. रितेश कांबळे आणि अंकिता मेस्त्री यांसारख्या कलाकारांसोबत काम करताना त्यांच्या परफॉर्मन्समधील सहजता आणि आत्मविश्वास वाढवण्यावर त्यांनी विशेष लक्ष दिले. “चॅलेंजिंग कामातूनच आपल्या स्किल्सचा सर्वोत्तम वापर करता येतो आणि एखाद्या कलाकाराला तयार करण्याची प्रक्रिया मला नेहमीच आवडते,” असे अवी पायल सांगतात. त्यांच्या मेहनतीतून साकारलेली ही कोरिओग्राफी सध्या व्हायरल आणि ट्रेंडिंग असून, प्रेक्षकांकडून तिचे कौतुक होत आहे.
दरम्यान, अवी पायल आता एका अनोख्या AI-based डिव्होशनल म्युझिक प्रोजेक्टमध्ये परफॉर्मर म्हणूनही दिसणार आहेत. भगवान शंकराला समर्पित या प्रोजेक्टमध्ये त्यांचा चेहरा, शरीर आणि बॉडी लँग्वेज वापरून प्रत्यक्ष शूट करण्यात आले असून, त्याला AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विशेष दृश्यरूप देण्यात आले आहे. शंकराच्या व्यक्तिमत्त्वातील सॉफ्टनेस, स्टेडीनेस आणि अग्रेशन यांचा समतोल साधणारी क्लासीकल बेस्ड कोरिओग्राफी त्यांनी साकारली आहे.
हा त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा आणि वेगळा प्रयोग ठरणार असून, आगामी काळात डिओशनल आणि स्पिरीच्युलीटीवर आधारित आणखी काही प्रोजेक्ट्स त्यांचे येणार आहेत. अवी पायल यांनी कोरिओग्राफ केलेलं रान मोहरलं हे रोमॅंटीक गाणं लवकरचं प्रदर्शित होणार आहे. डान्सर, कोरिओग्राफर आणि शिक्षक म्हणून नवीन आव्हानांचा स्वीकार करत अवी पायल पारंपरिक नृत्यकलेसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत आपल्या क्रिएटिव्ह प्रवासाला नवी दिशा देत आहेत.






