Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! हे पदार्थ पुन्हा गरम केल्यानंतर बनतात विष, आजपासूनच सेवन टाळा नाहीतर पडेल महागात

अनेकदा उरलेले अन्नपदार्थ आपण दुसऱ्या दिवशी गरम करून खातो मात्र तुम्हाला माहिती आहे का? स्वयंपाक घरातील काही पदार्थ गरम केल्यांनतर विष बनतात. यांचे सेवन आरोग्यासाठी फार घातक ठरू शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 08, 2024 | 01:00 PM
सावधान! हे पदार्थ पुन्हा गरम केल्यानंतर बनतात विष, आजपासूनच सेवन टाळा नाहीतर पडेल महागात

सावधान! हे पदार्थ पुन्हा गरम केल्यानंतर बनतात विष, आजपासूनच सेवन टाळा नाहीतर पडेल महागात

Follow Us
Follow Us:

भारतीय संस्कृतीत नेहमी जेवण हे थोडे जास्तीचे बनवले जाते, जेणेकरून कोणालाही ते कमी पडू नये. पोटात दोन घास जास्तीचे गेले तरी चालतील पण कमी पडायला नको अशी लोकांची धारणा असता, ज्यामुळे बऱ्याचदा घराघरात बनवलेले जेवण हे थोडे का होईना पण उरतेच. हे उरलेले जेवण आपण फेकून न देता ते फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी गरम करून खातो. आता हा प्रकार जवळजवळ सर्वांच्या घरात सुरु असतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? जेवण पुन्हा गरम केल्यानंतर त्यातील पोषक घटकांमध्ये बदल होतो आणि हे घटक विषारी बनतात.

जेवण पुन्हा गरम करून खाणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे पोटदुखी, उलट्या, विषबाधा, आणि इतर आरोग्यसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणते असे पदार्थ आहेत, जे कधीही पुन्हा गरम करून खाऊ नयेत याविषयी जाणून घेणे फार महत्त्वाचे ठरते. आज तुम्हाला रोज आहारात समावेश केल्या जणाऱ्या अशा काही अन्न पदार्थांविषयी सांगत आहोत जे पुन्हा गरम करताच विषारी बनतात. चला तर मग यात नक्की कोणकोणते पदार्थ सामील आहेत ते जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – 30 दिवस सलग हळदीचे सेवन केले तर असे अनोखे बदल दिसून येतील की स्वतःलाही ओळखू शकणार नाही

बटाटे

बटाटे पुन्हा गरम केल्यानंतर त्यातील स्टार्च खराब होऊन जातो, ज्यामुळे बटाट्यातील पोषक घटक कमी होऊन ते त्यातून विषारी घटक तयार होऊ लागतात. या कारणामुळे बटाटे उरले असतील त्यांना थंडच खावे किंवा योग्य तापमानावरच गरम करावेत. बटाट्यांमधील बदललेल्या स्टार्चमुळे ते पचायला कठीण होतात.

अंडी

अंडी ही प्रथिनांनी समृद्ध आहेत. अनेकजण आपल्या डाएट रुटीनमध्ये यांचा समावेश करत असतात. मात्र अंडी पुन्हा गरम केल्यांनतर त्यातील पोषक घटक विघटन पावतात आणि विषारी घटक तयार होऊ लागतात. यामुळे पोटदुखी आणि अपचन होण्याची शक्यता असते. त्यामुळेच अंडी कधीही थंड अवस्थेत खाणे योग्य असते.

चिकन

चिकन-मटणमध्ये ठासून प्रोटीन भरलेले असते मात्र यांना पुन्हा गरम करून खाल्ल्याने यातील बॅक्टेरिया वाढू लागतात. असे पुन्हा गरम केलेले चिकन चवीलाही विचित्र लागते. यामुळे फूड पॉयझनिंग होऊन पोटात गडबड होऊ शकते. यामुळे जुलाब आणि उलट्या देखील होऊ शकतात. त्यामुळे असे पदार्थ नेहमी ताजेच खावेत.

हेदेखील वाचा – ओरडून ओरडून शरीराची ही लक्षणे देत असतात गंभीर आजराचा इशारा, दुर्लक्ष केल्यास पडेल महागात

तेल

द्राक्षाचे तेल, अक्रोड तेल, एवोकॅडो तेल, हेझलनट तेल आणि फ्लेक्ससीड तेल या सर्वांमध्ये स्मोक पॉईंट कमी असतो, ज्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांना पुन्हा गरम करता तेव्हा ते उग्र ॲसिडिक होतात. म्हणून यांचा वापर स्वयंपाकासाठी कधीही करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: After reheating these 10 foods become toxic and cause to gut health and digestive problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 12:59 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
1

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
2

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
3

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
4

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.