
मुंबईतील सरकारी रुग्णालयांत रक्तटंचाई; थॅलेसेमिया, कर्करोग रुग्णांपुढे मोठे संकट
या रक्तटंचाईचा सर्वाधिक फटका नियमित रक्ताची गरज असलेल्या थैलेसेमिया रुग्णांना, कर्करोगावरील उपचार घेत असलेल्या रुग्णांना तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी दाखल असलेल्या रुग्णांना बसत आहे. काही रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी नातेवाईकांना रक्तदाते शोधण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. केईएम रुग्णालयातील एका रुग्णासाठी मोठ्या पेलविक शस्त्रक्रियेसाठी ओ पॉझिटिव्ह रक्ताच्या दोन युनिट्सची तातडीची आवश्यकता असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. तसेच सायन आणि जे.जे. रुग्णालयांमध्येही विविध रक्तगटांच्या रक्ताची मागणी वाढली असून अनेक रुग्ण प्रतीक्षेत असल्याचे समजते.
विशेष रक्तदान शिबिरे आयोजित करावीत
सायन रुग्णालयाच्या रक्तसंकलनात २३% घट
मुंबई पालिकेच्या सायन रुग्णालयाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२६ मध्ये जूनअखेरपर्यंत केवळ ६,८१७ रक्तपिशव्यांचे संकलन झाले असून त्यासाठी ६७ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. तुलनेत २०२५ मध्ये १५८ शिबिरांमधून १३.८७२ रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. म्हणजेच शिबिरांची संख्या आणि रक्तसंकलन या दोन्हीमध्ये मोठी घट झाली आहे. रुग्णालयाच्या गणनेनुसार रक्तसंकलनात सुमारे २३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली असल्याचा आरोप होत आहे, मात्र सायन रुग्णालयात रक्त तुटवडा भासण्याइतपत गंभीर स्थिती नसल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनाने ही बाब फेटाळली, आकडेवारीकडे पाहिल्यास रक्ताची मागणी आणि उपलब्धता यातील वाढती दरी स्पष्ट होते.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)