Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kanda Bhaji: पावसाळ्यात कांदा भजी का खावीशी वाटते, कारण माहिती आहे का?

पाऊस पडायला लागला की, हमखास कांदा भजी खाऊया हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी येतं. पण कधी विचार केलाय का? पावसाळ्यातच कांदा भजी खावीशी का वाटतात? यामागे नेमके कारण काय, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 10, 2026 | 03:35 PM
कांदा भजी आणि पावसाळ्याचा काय संबंध

कांदा भजी आणि पावसाळ्याचा काय संबंध

Follow Us
Follow Us:
  • पावसाळा आणि कांदा भजी काय आहे कनेक्शन
  • पावसाळ्यात कांदा भजी का खावीशी वाटतात 
  • कांदा भजी खाण्यामागे कारण 
गेले ५-६ दिवस महाराष्ट्रात सगळीकडे मुसळधार पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पावसाने झोडपले आहे. पण पाऊस पडायला लागला की, घरी असो वा ऑफिस असो सगळ्यांच्या तोंडून एकच वाक्य निघतं ते म्हणजे ‘मस्त पाऊस पडायला लागलाय आणि कांदा भजी खावीशी वाटतेय’ खरं आहे ना? पण कधी हा विचार केलाय का की पाऊस सुरू झाल्यानंतर कांदा भजीच का खावीशी वाटते? आता तुम्ही म्हणाल की, अरे हा विचार कधी केलाच नाही. पण पावसाळ्यात गरमागरम कांदा भजी खाण्यामागे हवामानातील बदलाबरोबरच मानसशास्त्रीय कारणेदेखील आहे.  पावसाचं वातावरण आणि कांदा भजी हे आपल्याकडे जणू काही समीकरणच झालंय. पण त्यामागची मुख्य कारणं नेमके काय आहे ते आपण लेखातून समजून घेऊया आणि आम्ही केलेला व्हिडिओदेखील तुम्ही नक्कीच पाहू शकता. 

माधुरी दीक्षितने सांगितलेली कांदा भजीची रेसिपी नक्की बनवून पहा,भजी होतील कुरकुरीत

कांदा भजी खावीशी वाटण्यामागे कारण  

पावसाळ्यात बाहेरचे वातावरण थंड असते. अशा वेळी शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला गरम आणि उष्णता देणारे अन्न खावेसे वाटते आणि यात सर्वात आधी तळलेले गरमागरम पदार्थ डोळ्यासमोर येतात

पावसामध्ये वातावरणात एक प्रकारचा मंदपणा असतो, ज्यामुळे आपला मूड कधीकधी आळसवाणा, उदास आणि कंटाळवाणा होऊ शकतो, ज्याला वैज्ञानिक भाषेत डोपामाईन म्हटलं जातं. पण अशावेळी गरम, मसालेदार आणि कुरकुरीत भजी खाल्ल्याने मेंदूत असणारे डोपामाइन नावाचे आनंदी संप्रेरक स्रवते, ज्यामुळे आपल्याला हायसे वाटते आणि थोडासा ताजेपणा येतो.

हेदेखील अजून एक कारण 

कुरकुरीत आणि चविष्ट भजी खाताना येणारा कुरकुरीत आवाज आणि तिखट-चमचमीत चव मनाला आणि जिभेला तृप्त करते अर्थातच आपल्या जिभेचे चोचले पुरवते हे काही वेगळं सांगायला नको.

याशिवाय आपल्याकडे लहानपणापासूनच पावसाळ्यात भजी खाण्याची एक परंपराच झाली आहे. त्यामुळे पाऊस पडताच आपोआप चहा आणि भजीची आठवण येते आणि आपसुकच पाय स्वयंपाकघराकडे वळतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांद्याचे आरोग्यदायी फायदे. कांद्यामध्ये असणारे घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात आणि बेसन आपल्याला ऊर्जा देते. म्हणूनच पावसाळ्यात कांद्याची भजी करून खाल्ली जाते. 

आता तुम्ही कसली वाट पाहताय. पावसामुळे घरीच असाल तर लगेच फक्कड चहा आणि कांदा भजीचा बेत आखा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा  

Monsoon Special: बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत कांदा भजी, चवीला एकदम भारी, वाचा रेसिपी

Web Title: Reason behind feel to eat kanda bhaji in monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Monsoon

संबंधित बातम्या

Bones: हाडांमध्ये सतत वेदना होत असतील तर दुर्लक्ष करू नका; वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या
1

Bones: हाडांमध्ये सतत वेदना होत असतील तर दुर्लक्ष करू नका; वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या

मुंबईतील सरकारी रुग्णालयांत रक्तटंचाई; थॅलेसेमिया, कर्करोग रुग्णांपुढे मोठे संकट
2

मुंबईतील सरकारी रुग्णालयांत रक्तटंचाई; थॅलेसेमिया, कर्करोग रुग्णांपुढे मोठे संकट

सकाळच्या नाश्ता करा हेल्दी, घरी बनवा खमंग तुपात भाजलेला ‘पालक थेपला’, मुलांच्या टीफीनसाठी ठरेल परफेक्ट पर्याय
3

सकाळच्या नाश्ता करा हेल्दी, घरी बनवा खमंग तुपात भाजलेला ‘पालक थेपला’, मुलांच्या टीफीनसाठी ठरेल परफेक्ट पर्याय

Monsoon Health: पावसाळ्यात बाहेरचे ‘हे’ चटपटीत पदार्थ खाणे टाळा; अन्यथा वाढू शकतो फूड पॉइझनिंगचा धोका
4

Monsoon Health: पावसाळ्यात बाहेरचे ‘हे’ चटपटीत पदार्थ खाणे टाळा; अन्यथा वाढू शकतो फूड पॉइझनिंगचा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.