Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GBS Outbreak: जीबीएसचा धोका वाढला! या गोष्टींवर आणणार निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Maharashtra GBS Outbreak: जळगावमध्ये जीबीएस आजाराची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण तीन वर्षांचा मुलगा आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 18, 2025 | 04:35 PM
जीबीएसचा धोका वाढला! या गोष्टींवर आणणार निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय (फोटो सौजन्य-X)

जीबीएसचा धोका वाढला! या गोष्टींवर आणणार निर्बंध? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा मोठा निर्णय (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra GBS Outbreak News Marathi: महाराष्ट्रातील जळगाव येथील एका ३ वर्षाच्या मुलाला ‘जीबीएस’ (GBS Outbreak) आजाराची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. या रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या मुलाला गेल्या काही दिवसांपासून पाय दुखण्याची तक्रार होती, त्यानंतर रक्त तपासणीत तो ‘जीबीएस’ आजाराने ग्रस्त असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात आतापर्यंत ‘जीबीएस’चे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एका महिला रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका तरुण आणि एका मुलावर उपचार सुरू आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात हा धोकादायक आजार वेगाने पसरत आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोल्हापूरसह अनेक ठिकाणी गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) पसरत आहे. पुण्यात २०८ रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे. यापैकी ४२ रुग्ण पुणे महानगरपालिकेतील आहेत. याशिवाय १२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आजारामुळे राज्यातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Mumbai GBS News: मुंबईकरांनो सावधान! जीबीएसचा पहिला मृत्यू

यावर येणार निर्बंध?

जीबीएस आजार जर गर्दीमुळे आणि संसर्गजन्य असल्याचे स्पष्ट झाले तर आरोग्य यंत्रणा व प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील यात्रांवर निर्बंध आणण्याबाबत विचार करू असे सुतोवाच देशाचे आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी येथे केले . तसेच राज्यात अनेक ठिकाणी जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जीबीएसचा हा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, जीबीएस हा आजार जर गर्दीमुळे आणि संसर्गजन्य असल्याची माहिती मिळाली तर वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाची बैठक घेऊन लवकरच राज्यातील व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच यात्रा यावर निर्बंध आणण्याबाबत विचार सुरू असल्याचं संकेत प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत. प्रतापराव जाधव पुढे म्हणाले, जीबीएस आजार मोठ्या प्रमाणात वाढत असून हा आजार काहीसा जीवघेणा ठरत आहे. त्यात जर जीबीएस हा आजार संसर्गजन्य असेल तर तात्काळ अधिकारी डॉक्टर यांची बैठक घेऊन राज्यात होणाऱ्या गर्दीच्या यात्रावर बंदी आणण्याचे संकेत दिले आहेत.

काय म्हणाले डॉ. अविनाश ?

या आजाराबाबत डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, लोकांना हा आजार जंतू आणि बॅक्टेरियामुळे होत नाही. काही विषाणू अन्नाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात. त्यावेळी हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. जीबीएस पसरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने कोणत्याही प्रकारे दूषित पाणी, अन्न किंवा मांस सेवन केले आहे. ते म्हणाले की, जीबीएस हा केवळ मांसाहारी पदार्थ खाल्ल्याने होतो असे म्हणणे चुकीचे आहे. बऱ्याच अंशी हे नक्कीच खरे आहे.

डॉक्टरांनी या आजारापासून बचाव करण्याचा मार्ग सांगितला आहे. ते म्हणाले की, प्रत्येकाने दूषित मांस किंवा उघडे अन्न खाणे टाळावे. जीबीएसचा त्रास होऊ नये म्हणून, फक्त शिजवलेले मांसाहारी पदार्थ खा. डॉक्टरांनी सांगितले की जर त्याचा विषाणू कोंबड्यांमध्ये असेल तरच कोणत्याही व्यक्तीला त्याचा संसर्ग होऊ शकतो. चिकन खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संसर्ग होईलच असे नाही.

पुण्यात पसरलेल्या GBS च्या उपायासाठी किती येतोय खर्च? 

Web Title: Gbs outbreak news marathi maharashtra sees 2 new deaths and india toll hits 21

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 04:35 PM

Topics:  

  • GBS
  • maharashtra

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
3

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.