Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Iran War Impact: आखाती युद्धाचा परिणाम थेट औषधविश्वावर ! कच्चा माल, एपीआय आणि पॅकेजिंग, प्रिंटिंग शाईच्या दरात मोठी

औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत ३० ते १०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या वाढीचा परिणाम अद्याप किरकोळ बाजारातील औषधांच्या किमतींवर पूर्णपणे झालेला नाही.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 27, 2026 | 12:11 PM
आखाती युद्धाचा परिणाम थेट औषधविश्वावर ! कच्चा माल, एपीआय आणि पॅकेजिंग, प्रिंटिंग शाईच्या दरात मोठी (फोटो सौजन्य-ChatGPT)

आखाती युद्धाचा परिणाम थेट औषधविश्वावर ! कच्चा माल, एपीआय आणि पॅकेजिंग, प्रिंटिंग शाईच्या दरात मोठी (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • गोळ्या बनवणे व पॅकेजिंग महागले
  • जीवनावश्यक औषधे प्रचंड महागली, किंमतीत झाली इतकी वाढ
  • ओमेप्राझोलसारख्या औषधांच्या कच्च्या मालाचा खर्च दुप्पट
मुंबई : जागतिक युद्धजन्य परिस्थितीचे परिणाम आता औषध उत्पादनावर दिसू लागले आहेत. कच्चा माल, एपीआय आणि पॅकेजिंग, प्रिंटिंग शाईच्या दरात मोठी वाढ झाल्याने गोळ्या तयार करणे महाग झाले असून, सध्या किमती स्थिर असल्या तरी आगामी काळात वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत ३० ते १०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या वाढीचा परिणाम अद्याप किरकोळ बाजारातील औषधांच्या किमतींवर पूर्णपणे झालेला नाही.
उद्योगातील उत्पादक, स्टॉकिस्ट आणि पुरवठादारांच्या मते, सध्या कंपन्या वाढलेला खर्च काही प्रमाणात स्वतः पेलत आहेत. ही स्थिती दीर्घकाळ टिकवणे कठीण असल्याचे ते सांगतात.

Mumbai News : शीव रुग्णालय 3286 खाटांचे होणार, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पॅरासिटोमोलसारख्या सर्वसामान्य औषधांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च वाढला असून, डोलो, मेटासिन आणि कल्पोलसारख्या गोळ्यांच्या निर्मितीवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. अॅसिडिटीवरील ओमेप्राझोलसारख्या औषधांसाठी लागणाऱ्या घटकांच्या किमतीही दुपटीकडे गेल्या आहेत. यापूर्वी सुमारे ३५० रुपये खर्च येणाऱ्या घटकांसाठी आता जवळपास ६५० रुपये मोजावे लागत आहेत.

पॅकेजिंग क्षेत्रातही मोठी वाढ नोंदवली जात आहे. पेट्रोकेमिकलवर आधारित साहित्य महागल्याने गोळ्यांच्या स्ट्रिपचा खर्च सुमारे ७५ टक्क्यांनी वाढला आहे. तसेच औषधांवर छापण्यात येणाऱ्या शाईच्या किमतीही दुपटीकडे गेल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे औषधांच्या उत्पादन खर्चावर ताण वाढला असून, पुढील काळात हा भार ग्राहकांवर टाकावा लागण्याची शक्यता औषध व्यवसायिक सांगत आहेत.

“कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्च झपाट्याने वाढला आहे. सध्या कंपन्या हा भार सहन करत असल्या, तरी पुढे किमती वाढवणे अपरिहार्य ठरू शकते. ३० ते १०० टक्क्यांपर्यंत कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चावर मोठा ताण आला आहे.” अशी प्रतिक्रिया अर्जेंनिक्स हेल्थ केअर प्रा. लि. सीईओ राजेश गुऱ्हानी यांनी दिली.

*पॅरासिटोमोलची किंमत २३५-२५५ वरून ३५०-५०० पर्यंत वाढीच्या दिशेने
*डोलो, मेटासिन, कल्पोलसारख्या गोळ्यांनाही फटका
*ओमेप्राझोलसारख्या औषधांच्या कच्च्या मालाचा खर्च दुप्पट
*पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ
*औषधांच्या स्ट्रीप आणि प्रिंटिंग शाईचा खर्चही दुपटीकडे

 

Web Title: Global conflict impact pharma industry rising raw material costs medicine prices likely to increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 12:11 PM

Topics:  

  • health
  • Inflation
  • Pharma

संबंधित बातम्या

US Health : अमेरिकन नागरिकांचे आयुर्मान वाढतेय; औषधनिर्माण क्षेत्र आणि भांडवलशाहीचा मोठा वाटा?
1

US Health : अमेरिकन नागरिकांचे आयुर्मान वाढतेय; औषधनिर्माण क्षेत्र आणि भांडवलशाहीचा मोठा वाटा?

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!
2

Chicken Price Hike : आधी भाजीपाला, मग अंडी अन् नंतर चिकनचा नंबर? श्रावण महिना संपताच खवय्यांच्या खिशाला बसणार मोठा झटका!

ऐन सणासुदीत साखरेला दरवाढीचा झटका, कृषीमंत्री भरणे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच…’
3

ऐन सणासुदीत साखरेला दरवाढीचा झटका, कृषीमंत्री भरणे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच…’

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार
4

Food Inflation : कांदा, तेल, साखर आणि आता… किमती कडाडल्या, अचानक का वाढली महागाई? ऐन सणासुदीला बजेट कोलमडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.