Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Abitkar: मानसिक आरोग्यासाठी सरकारचा पुढाकार! टेली-मानस हेल्पलाइनसह उपचार सेवांचे बळकटीकरण

Health: जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात ‘मनजागृती’ आणि ‘मनसंवाद’ या संदेशांतून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 10, 2026 | 05:25 PM
Health Minister Prakash Abitkar

Health Minister Prakash Abitkar

Follow Us
Follow Us:
  • राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणार
  • टेली-मानस हेल्पलाइनला ३ लाख २७ हजारांहून अधिक कॉल्स
  • स्मृतीदोष क्लिनिकमधून दरवर्षी ४५ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ
मुंबई/Health: मानसिक आरोग्याविषयी जनजागृती, समुपदेशन आणि उपचार सेवा अधिक सुलभ करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. टेली-मानस हेल्पलाइन, मनशक्ती क्लिनिक, स्मृतीदोष क्लिनिक आणि मनोसामाजिक पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवांचे जाळे बळकट करण्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भर आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून नागरिकांना वेळेत मदत मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त (१० ऑक्टोबर) राज्यात ‘मनजागृती’ आणि ‘मनसंवाद’ या संदेशांतून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यंदाची जागतिक संकल्पना प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तींचे म्हणणे ऐकून त्यातून सकारात्मक बदल घडविण्याची आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींना केवळ ऐकून घेणे पुरेसे नसून, त्यांच्या अनुभवांना सेवा आणि निर्णयप्रक्रियेत स्थान मिळणे आवश्यक आहे.

टेली-मानसला तीन लाखांहून अधिक कॉल्स

मानसिक ताण, चिंता, नैराश्य तसेच अन्य मानसिक आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी टेली-मानस ही २४ तास उपलब्ध असलेली राष्ट्रीय हेल्पलाइन सुरू आहे. राज्यात २०२२-२३ पासून एप्रिल २०२६ पर्यंत या सेवेला तीन लाख २७ हजारांहून अधिक कॉल्स प्राप्त झाले आहेत. मानसिक आरोग्यविषयक मदतीसाठी नागरिकांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधता येत असल्याने या सेवेचे महत्त्व वाढले आहे. टेली-मानस हेल्पलाइन क्रमांक १४४१६ असा आहे.

Nagpur Health : रुग्णांच्या जीवाशी खेळाल तर कारवाई अटळ; आरोग्य विभागाचा इशारा

प्राथमिक आरोग्य केंद्रांतूनही उपचार

मानसिक आरोग्यविषयक सेवा नागरिकांच्या जवळ उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर मनशक्ती क्लिनिकच्या माध्यमातून सेवा देण्यावर भर दिला जात आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांची वेळीच ओळख, समुपदेशन, उपचार आणि आवश्यकतेनुसार पुढील वैद्यकीय सेवांसाठी संदर्भ देणे, यामुळे रुग्णांना मदत मिळू शकते. मानसिक आरोग्याच्या समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींचे पुनर्वसन आणि सामाजिक पुनर्समावेशन यांसाठीही प्रयत्न केले जात आहेत.

स्मृतीदोष क्लिनिकचा हजारो ज्येष्ठांना आधार

वाढत्या वयात जाणवणाऱ्या स्मरणशक्तीशी संबंधित समस्यांचे निदान आणि उपचार करण्यासाठी स्मृतीदोष क्लिनिकच्या माध्यमातून विशेष बाह्यरुग्ण सेवा दिल्या जात आहेत. या क्लिनिकमध्ये दरवर्षी सुमारे ४५ हजारांहून अधिक नागरिक लाभ घेत असल्याची माहिती आहे. स्मृतीदोष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह त्यांच्या कुटुंबीयांना मार्गदर्शन आणि आवश्यक वैद्यकीय मदत मिळवून देण्यात या सेवांची भूमिका महत्त्वाची आहे.

स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग

मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी शासनासोबत स्वयंसेवी संस्थांचा सहभागही घेतला जात आहे. आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट, एकलव्य फाउंडेशन आणि श्रद्धा फाउंडेशन यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने जनजागृती, समुपदेशन आणि समुदायस्तरावरील मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. शासन, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि समाज यांच्या समन्वयातून मानसिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याचे उद्दिष्ट आहे.

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

कलंक दूर करण्यासाठी ‘मनसंवाद’

मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत समाजात असलेले गैरसमज आणि कलंक दूर करणे ही काळाची गरज आहे. ‘मनजागृती’ या संदेशातून प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तींचे म्हणणे संवेदनशीलतेने ऐकण्याचे, तर ‘मनसंवाद — बोलूया, ऐकूया, समजून घेऊया’ या उपक्रमातून मानसिक आरोग्याबाबत मोकळेपणाने संवाद साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मानसिक आरोग्य सेवा अधिनियम, २०१७ नुसार मानसिक आजार असलेल्या व्यक्तींचे अधिकार, सन्मान आणि गोपनीयता जपणे महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी मदत घेणे आणि गरजू व्यक्तींना आधार देणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्याबाबत जागरूक, संवेदनशील आणि कलंकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

Web Title: Health minister prakash abitkar said mental health services in maharashtra strengthened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Health News
  • Maharashtra Health Department
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
1

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन
2

Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.