तांदळाचे 'हे' प्रकार तुम्हाला माहितेय का? जाणून त्याचे आरोग्याला होणारे फायदे
भात हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भात खाल्ला म्हणजे जेवण जेवल्यासारखं वाटतं असं भातप्रेमी कायमच म्हणतात. पण तुम्हाला माहितेय का तांदळाचे जगभरात एकूण 1 लाख 20 हजार इतक्या प्रजाती आहेत. त्यातल्या त्यात आशियाई देशात तांदळाच्या एकूण 40 हजार प्रजाती आढळतात. चला तर जाणून घेऊयात तांदळाच्या विविध प्रजाती आणि त्यांचे आरोग्याला होणारे फायदे…
पांढरा तांदूळ
बहुतांश प्रमाणात पांढऱ्या रंगांच्या तांदळाचा भात हा सर्वात जास्त लोकप्रिय आहे. बासमती, इंद्रायणी, कोलम, मोगरा या आणि अशा पांढऱ्या रंगाचा तांदूळ भारतात सर्वाधिक मिळतो. कोकण पट्ट्यात देखील उकडा भात हा प्रामुख्याने खाल्ला जातो. पांढऱ्या रंगाच्या तांदळात कोंड्याचं प्रमाण कमी असतं. तसंच पांढऱ्या रंगाच्या तांदळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. त्याचबरोबर पोटॅशिअम आणि सोडियमचं प्रमाण यात मोठ्या प्रमाणात आढळतं त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार दूर होतात.
हेही वाचा- रोजच्या आहारात करा ‘या’ पांढऱ्या पदार्थाचे सेवन, पचनक्रिया सुधारण्यासोबत आरोग्याला होतील अनेक फायदे
तपकिरी रंगाचा तांदूळ
हा तांदळाला कोणत्याही प्रकारे पॉलिशिंग केलेले नसते. तपकिरी रंगाचा तांदूळ हा आग्नेय आणि दक्षिण आशियातील देशांत प्रामुख्याने आढळून येतो. विशेषत: भारत., चीन, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमध्ये तपकिरी रंगाच्या तांदळाची लागवड केली जाते. हा तांदळाचा भात खाणं आरोग्यदायी मानलं जातं. तपकिरी रंगांच्य़ा तांदळात प्रोटीनची मात्रा मुबलक प्रमाणात असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
काळ्या रंगाचा तांदूळ
या तांदळाचं पीक प्रामुख्याने इंडोनेशिया देशात घेतलं जातं. भारतात नागालँड,मणिपूर आणि छत्तीसगढ या राज्यात देखील काळ्या तांदळाची शेती केली जाते. जगभरात फक्त 10 टक्के या तांदळाची लागवड केली जाते. त्यामुळे हा तांदूळ फारच दुर्मिळ प्रमाणात आढळतो..या भाताच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. यात असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारतं.
हेही वाचा- हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी साखरेचा वापर न करता बनवा पौष्टिक शेंगदाणा लाडू
लाल तांदूळ
लाल तांदूळ खासकरुन ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, चीन, भारत, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, नेपाळ, पापुआ न्यू गिनी, फिलीपिन्स, श्रीलंका, थायलंड आणि व्हिएतनाम या देशात केली जाते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर लाल तांदळाचा भात खाणं फायदेशीर आहे. लाल तांदळाचा भात खाल्ल्याने वजन लवकर कमी होतं. या भाताच्या सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.