खोपोली शहर व खालापूर तालुका ओबीसी समाजाच्या वतीने शासनाने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरला तीव्र विरोध दर्शविण्यात आला. या जीआरद्वारे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याला विरोध करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन सादर करण्यात आले.ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात नमूद करण्यात आले की ओबीसी प्रवर्गात आधीच साडेतीनशेहून अधिक जाती असून त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही. अशा परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केल्यास मूळ ओबीसी समाजावर अन्याय होईल.
.