Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaslok Hospital मध्ये मोठी कामगिरी; स्वदेशी मेनिस्कस ट्रान्सप्लांट यशस्वी

जसलोक हॉस्पिटलमधील ही शस्त्रक्रिया २१ वर्षीय इंजिनीअरिंग शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्यावर करण्यात आली. खेळादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्‍याला आपली मेनिस्कस (गुडघ्यातील कुर्चा) गमावावी लागली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 30, 2026 | 06:35 PM
Jaslok Hospital मध्ये मोठी कामगिरी; स्वदेशी मेनिस्कस ट्रान्सप्लांट यशस्वी
Follow Us
Follow Us:

भारतात प्रथमच एकाच संस्थेत मेनिस्कस अॅलोग्राफ्ट ट्रान्सप्लांट यशस्वी
जसलोक हॉस्पिटलची मोठी कामगिरी
स्वदेशी मेनिस्कस ट्रान्सप्लांट यशस्वी

मुंबई: भारतातील नी प्रिझर्व्हेशन शस्त्रक्रियेतील महत्त्वपूर्ण प्रगतीसह जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने एकाच संस्थेमध्ये दान केलेल्या, प्रक्रिया केलेल्या आणि प्रत्यारोपित केलेल्या ग्राफ्टचा वापर करून (Health) मेनिस्कस अॅलोग्राफ्ट ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. डॉ. प्रसाद भागुंडे, कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक्स व स्पोर्ट्स मेडिसीन एक्स्पर्ट यांच्या नेतृत्वाखालील सर्जिकल टीमने ही शस्त्रक्रिया केली. सर्जरीसाठीच्या ॲनेस्थेसीयासाठी डॉ. रजनी एम आर, कन्सल्टन्ट ॲनेस्थेसीयोलाॅजी, जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांचे मोलाचे सहाय्य लाभले. ही शस्त्रक्रिया भारतातील गुडघा जतन शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाचे पाऊल ठरले आहे, ज्‍यामधून सिद्ध झाले आहे की, देशातील संस्था आता उती दान, जतन आणि प्रत्यारोपण या संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करू शकतात.

जसलोक हॉस्पिटलमधील ही शस्त्रक्रिया २१ वर्षीय इंजिनीअरिंग शिक्षण घेत असलेल्‍या विद्यार्थ्यावर करण्यात आली. खेळादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्‍याला आपली मेनिस्कस (गुडघ्यातील कुर्चा) गमावावी लागली होती. यापूर्वी अनेक शस्त्रक्रिया केल्‍यानंतर देखील त्याला असह्य वेदना होत होत्या, ज्याचा परिणाम त्याच्या चालण्यावर आणि सांध्यांच्या दीर्घकालीन आरोग्यावर होत होता. हा रुग्ण आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी अर्धवेळ खेळाडू म्हणूनही काम करत होता. उपचारासाठी जसलोक हॉस्पिटलमध्‍ये येण्यापूर्वी त्याला साधे चालणे देखील कठीण झाले होते.

गुडघ्याच्या सांध्यामध्ये मेनिस्कस (कुर्चा) हा अत्यंत महत्त्वाचा शॉक अॅब्झॉर्बर म्हणून काम करतो. दुखापतीमुळे किंवा वारंवार होणाऱ्या शस्त्रक्रियांमुळे हा कुर्चा पूर्णपणे काढून टाकला जातो, तेव्हा रुग्णांना सतत वेदना, सूज आणि कमी वयात संधिवात होण्याचा धोका निर्माण होतो. तरुण आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या व्यक्तींवर याचा गंभीर परिणाम होतो, जेथे या रचनेच्या अभावामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. मेनिस्कस पूर्णपणे नष्ट झाला की पुन्हा नैसर्गिकरित्या तयार होत नाही, आणि सध्या असे कोणतेही कृत्रिम इम्प्लांट उपलब्ध नाही जे त्याचे नैसर्गिक कार्य पूर्णपणे पूर्ववत करू शकेल. अद्याप गंभीर संधिवात झालेला नाही अशा निवडक रुग्णांसाठी दान केलेल्या उती वापरून केलेले प्रत्यारोपण एकमेव उपचार आहे, जो सांध्याचे कार्य नैसर्गिक पातळीवर आणू शकतो.

Jaslok Hospital : “सगळं संपलं होतं…; पण एका हलक्या हालचालीने दिली नव्या आयुष्याची आशा”, जसलोक हॉस्पिटलचे यश

या केसमध्‍ये मेनिस्कस ग्राफ्ट जसलोक हॉस्पिटलमध्‍ये दान करण्यात आला होता आणि नंतर त्याच संस्थेतील रुग्णाच्या प्रत्यारोपणासाठी वापरला गेला. स्थानिक पातळीवर दान आणि प्रत्यारोपणाचे चक्र पूर्ण होणे ही दुर्मिळ घटना आहे. या केसमधून निदर्शनास येते की, देशांतर्गत होणारे उती दान गुंतागुंतीची सांधे जतन प्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना प्रत्‍यक्ष आधार देऊ शकते.

या डोनर ग्राफ्टचा वापर करून जसलोक हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया तज्ञांनी किमान इन्व्हेसिव्ह आर्थ्रोस्कोपिक पद्धतीने हे प्रत्यारोपण केले. गुडघ्याची नैसर्गिक कूशनिंग आणि स्थिरता परत मिळवण्यासाठी अचूक आकाराचा मेनिस्कस प्रत्यारोपित करण्यात आला. सांध्याचे कार्य सुधारणे आणि रुग्णाला पुन्हा पूर्वीसारखी हालचाल करता येणे, हा या शस्त्रक्रियेचा मुख्य उद्देश होता.

‘चुकीचे निदान, चुकीची औषधे अन्…’; जसलोक हॉस्पिटलने केले ‘या’ प्रकरणाचे यशस्वी निराकरण

या शस्त्रक्रियेबद्दल मत व्‍यक्त करत जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. प्रसाद भागुंडे, कन्सल्टन्ट ऑर्थोपेडिक्स व स्पोर्ट्स मेडिसीन एक्स्पर्ट म्हणाले, ”मेनिस्कस प्रत्यारोपणामध्ये प्रत्यारोपित केलेला’ग्राफ्ट रुग्णाच्या मूळ उतीप्रमाणे कार्य करेल, याची खात्री घेण्‍याचे आव्‍हान असते. ग्राफ्टचा आकार किंवा त्याच्या स्थानामध्ये थोडासाही फरक असल्यास हालचाल करताना गुडघ्यावर पडणाऱ्या वजनाच्या वितरणावर परिणाम होऊ शकतो. या केसमध्‍ये आम्ही ग्राफ्टची जुळवाजुळव आणि शस्त्रक्रियेदरम्यान त्याचे स्थान निश्चित करण्यासाठी बराच वेळ नियोजन केले, ज्‍यामुळे सांध्याला नैसर्गिक लवचिकता आणि स्थिरता पुन्हा मिळाली. तरुण आणि सक्रिय रुग्णासाठी ही अत्यंत आवश्यक बाब आहे.”

 

Web Title: Major achievement at jaslok hospital indigenous meniscus transplant successful mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 06:35 PM

Topics:  

  • health
  • Health News
  • Jaslok Hospital

संबंधित बातम्या

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स
1

Amazon: नो स्पॅम कॉल्स, नो एजंट! अमेझॉन पेवर आता स्वतःच निवडा अन् खरेदी करा हेल्थ इन्शुरन्स

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
2

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
3

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम
4

Migraine: मायग्रेनच्या त्रासाने हैराण? ‘या’ सवयी ठरतील फायदेशीर, डोकेदुखीपासून मिळेल आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.