Heart Attack Signs: छातीत जळजळ पासून अस्वस्थतेपर्यंत, हृदयाच्या 'या' संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
हृदयविकाराचा झटका येणे हा एक गंभीर आजार आहे जो आता अनेकांना जडू लागला आहे. हा आजार अचानक कधीही आणि कुठेही होऊ शकतो. बहुतेक प्रकरणांमध्ये हृदयाचा हा झटका प्राणघातक ठरतो. आजकाल अनेकजण कमी वयातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावत आहेत. काही समजेपर्यंतच हा आजार लोकांचे प्राण घेतो. त्यामुळे याबाबत जागरूकता असणे फार गरजेचे आहे. हृदयाच्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन हृदयाच्या स्नायूंना हानी पोहोचते तेव्हा असे होते.
हृदयविकाराच्या झटक्याची काही लक्षणे स्पष्ट असतात, तर काही अदृश्य राहू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, आपले शरीर फार काळ आधीपासून आपल्याला या आजाराचे संकेत देत असतात मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या लक्षणांकडे जर वेळीच लक्ष दिले तर याचा धोका टाळता येऊ शकतो. आज आपण या लेखात हार्ट अटॅकच्या काही संकेतांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
तूप-त्रिफळा-आवळा… डॉक्टरांनी सांगितले मोतीबिंदूवर घरगुती उपाय; दीर्घकाळ टिकून राहील दृष्टी
छातीत दुखणे
हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा अस्वस्थता. हे सहसा दाब, घट्टपणा, जडपणा किंवा जळजळ म्हणून जाणवते. ही वेदना सहसा छातीच्या मध्यभागी येते आणि काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकू शकते. कधीकधी ही वेदना मान, डावा जबडा, खांदा, पाठ किंवा हातांमध्ये पसरू शकते. तथापि, कधीकधी छातीत दुखणे गॅसमुळे देखील होऊ शकते.
श्वास घेण्यास त्रास होणे
छातीत दुखणे किंवा त्याशिवाय श्वास लागणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमुख लक्षण असू शकते. जेव्हा हृदय योग्यरित्या कार्य करत नाही आणि योग्य प्रमाणात ऑक्सिजन फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते. जर तुम्हाला कोणत्याही प्रयत्नाशिवाय श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
मुलांच्या ‘या’ सवयी वाढवतात मधुमेहाचा धोका, बालपणीच सुधारल्या तर आयुष्यभर रहाल निरोगी
हृदयाच्या ठोक्यात अनियमितता जाणवणे
जर तुम्हाला तुमच्या हृदयाच्या ठोक्यात अनियमितता जाणवत असेल तर ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. याला बऱ्याचदा “पॅल्पिटेशन” असे म्हटले जाते. यामध्ये हृदय वेगाने धडधडत आहे असे वाटते किंवा हे ठोके कमी होत असल्याची जाणीव होऊ लागते. हे लक्षण गंभीर असू शकते आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्वाचे आहे.
विनाकारण थकवा जाणवणे
जर तुम्हाला कोणतेही काम न करता खूप थकल्यासारखे वाटत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. हा थकवा सहसा काही दिवस किंवा आठवडे अगोदर सुरू होतो आणि हळूहळू वाढू शकतो. हे लक्षण स्त्रियांमध्ये जास्त दिसून येते. तुम्हालाही असे काही संकेत तुमच्या शरीरात जाणवत असतील तर वेळीच हॉस्पिटल गाठा आणि यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.