Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai : सात जणांना नवे आयुष्य; स्ट्रोकमुळे मेंदूला ईजा, 60 वर्षीय गृहस्थाच्या कुटुंबाचा एकमताने अवयव दानाचा निर्णय

स्ट्रोकमुळे मेंदूमृत झालेल्या 60 वर्षीय संजय शहा यांच्या कुटुंबाने सामाजिक भान जपत अवयवदानाचा निर्णय घेतल्याने सात जणांना नवे आयुष्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2026 | 07:29 PM
Mumbai : सात जणांना नवे आयुष्य; स्ट्रोकमुळे मेंदूला ईजा, 60 वर्षीय गृहस्थाच्या कुटुंबाचा एकमताने अवयव दानाचा निर्णय
Follow Us
Follow Us:
  • सात जणांना नवे आयुष्य;
  • 60 वर्षीय गृहस्थाच्या कुटुंबाचा एकमताने अवयव दानाचा निर्णय
स्ट्रोकमुळे मेंदूमृत झालेल्या 60 वर्षीय संजय शहा यांच्या कुटुंबाने सामाजिक भान जपत अवयवदानाचा निर्णय घेतल्याने सात जणांना नवे आयुष्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. कुटुंबीयांनी एकमताने घेतलेल्या या निर्णयातून यकृत आणि मूत्रपिंडांचे दान करण्यात आले, तर कॉर्निया आणि हाडेही दान करण्यात आली. मुंबईत यंदाचे हे 17 वे देहांतर्गत अवयवदान ठरले.

ठाणे येथील ज्युपिटर लाइफलाइन रुग्णालयात हा अवयवदानाचा निर्णय प्रत्यक्षात आला. संजय शहा हे पॅथॉलॉजी लॅब चालवत होते. स्ट्रोक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला डॉक्टरांनी ते 80 टक्के मेंदूमृत अवस्थेत असल्याचे कुटुंबाला सांगितले. काही वेळातच त्यांना पूर्णपणे मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबीयांना अवयवदानाचा पर्याय सुचवला. दरम्यान पत्नी नम्रता शहा यांनी मुलगा दर्शित शहा याला परिस्थितीची माहिती दिली. दर्शित हा एमएससीचे शिक्षण घेत असून आई-मुलाने अवयवदानाचा विचार सकारात्मकरीत्या स्वीकारला. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील इतर सदस्य मावशी, आत्या, काका यांच्याशीही चर्चा करण्यात आली. सर्वांच्या एकमताने अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. राज्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार अवयवांचे वितरण करण्यात आले असून यकृत आणि मूत्रपिंडे प्रत्यारोपणासाठी देण्यात आली, तर कॉर्निया आणि हाडांचे ऊतकही दान करण्यात आले, अशी माहिती झेडटीसीसी (झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर) मुंबईकडून देण्यात आली.

हाडांमध्ये वाढलेल्या सामान्य वेदना असू शकतात Bone Cancer चे संकेत, दुर्लक्ष केल्यास कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

“माझ्या वडिलांना कोणतेही व्यसन नव्हते. ते आरोग्याने सुदृढ होते. त्यांचे अवयव दुसऱ्याच्या आयुष्यासाठी उपयोगी पडले तर त्यातून मदत होईल, असा आमचा विचार होता. वडिलांची स्वतःची चॅरिटी संस्था आहे. कोरोनाच्या काळात परिसरातील मृत्यू पाहून त्यांनी समाजसेवेत अधिक लक्ष घातले. प्रयोगशाळेतून केवळ चरितार्थापुरते पैसे घेत उर्वरित चाचण्या अनेकांना मदत म्हणून करून देत असत,”
-दर्शित शहा, अवयदात्याचा मुलगा.

नव्यासारखा चमकेल जुना चष्मा, Eyeglasses साफ करण्याचा योग्य मार्ग जाणून घ्या; चुकीच्या पद्धतीमुळे होऊ शकतो डोळ्यांवर परिणाम

Web Title: New life for seven people brain injury due to stroke family of 60 year old man unanimously decides to donate organs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • brain stroke
  • Health News
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे
1

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
2

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
3

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.