Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: दिवाळीत प्रदूषणाचे वाढते प्रमाण! गर्भवती महिलांनी ‘अशी’ घ्या काळजी

दिवाळीत फटाक्यांचा धूर, वाढत्या वाहनांचे प्रदुषण आणि धूळ यामुळे हवेतील प्रदूषणाचं प्रमाण झपाट्याने वाढतं.याचा सर्वात जास्त होणारा त्रास हा  गर्भवती महिलांना असतो. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 20, 2025 | 03:20 AM
Diwali 2025: दिवाळीत प्रदूषणाचे वाढते प्रमाण! गर्भवती महिलांनी ‘अशी’ घ्या काळजी
Follow Us
Close
Follow Us:
  • दिवाळीत प्रदूषणाचे वाढते प्रमाण
  • गर्भवती महिलांनी कशी घ्यावी काळजी ?
  • फटाक्यांचा धूर, वाढत्या वाहनांचे प्रदुषण

दिव्यांची आरास, नक्षीदार रांगोळी आणि चविष्ट फराळ अशी दिवाळीची आठवण. आनंद आणि उत्साहाच्या या वातावरणात सध्या एका गोष्टीचा अतिरेक जास्त पाहायला मिळतो. ते म्हणजे फटाके. खरंतर फटाके हे तसे खूप आधीपासून दिवाळीत फोडले जातात. मात्र आाताच्या काळात त्याचा वापर आणि त्यातील केमिकलचा दुष्परिणाम हा जास्त वाढत आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळीच्या रंगीत अशा सणाचा फटाक्यांनी बेरंग केला आहे. या सणासोबत वाढलेलं वातावरणीय प्रदूषण चिंताजनक ठरत आहे. फटाक्यांचा धूर, वाढत्या वाहनांचे प्रदुषण आणि धूळ यामुळे हवेतील प्रदूषणाचं प्रमाण झपाट्याने वाढतं. हे प्रदूषण सर्वांसाठी धोकादायक असलं तरी, याचा सर्वात जास्त होणारा त्रास हा  गर्भवती महिलांना असतो.

नसांमध्ये अडकलेला सर्व कचरा 100% पडेल बाहेर, आहारतज्ज्ञांनी सांगितला सफरचंद-लिंबाचा खात्रीशीर उपाय; लगेच दिसून येईल फरक

फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आणि सूक्ष्म धूलिकण (PM 2.5, PM 10) असतात. हे घटक श्वसनसंस्थेवर घातक परिणाम करतात. एवढंच नाही तर रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी देखील यामुळे कमी होतं. गर्भवती महिलांमध्ये यामुळे थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी, श्वास घेताना त्रास अशा समस्या निर्माण होऊ शकतात. काही अभ्यासांनुसार, जास्त प्रदूषणामुळे गर्भातील बाळाच्या वाढीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

या काळात महिलांनी काही सोपे पण प्रभावी उपाय करणे आवश्यक आहे.

फटाक्यांच्या धुरापासून शक्य तितके दूर राहा.

घरात धूप आणि कापूर जाळा यामुळे घरातील वातावरण जंतूनाशक होईल.

बाहेर पडताना N95 मास्क वापरा.

घरात एअर प्युरिफायर किंवा झाडं (जसे की मनी प्लांट, स्पायडर प्लांट) ठेवा.

भरपूर पाणी, लिंबूपाणी, नारळपाणी प्या यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

आहारात हिरव्या भाज्या, फळं आणि अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा समावेश करा.

सकाळी किंवा संध्याकाळी धुराच्या वेळेत बाहेर जाणं टाळा.

काही जणांना फटाक्यांच्या धुरामुळे शिंका येतात त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधं घ्या.

रोज रात्री झोपताना कोमट हळदीचं दूध प्या जेणेकरुन तुम्हा घसादुखी किंवा सर्दीचा फार त्रास होणार नाही.

दिवाळीचा आनंद साजरा करताना सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धतीने साजरी करणे हीच खरी आनंदाची आणि समाधानाची दिवाळी आहे.तेलाचे दिवे, फुलं, सुगंधी मेणबत्त्या आणि निसर्गपूरक सजावट यांचा वापर करा. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी केल्यास आई-बाळ दोघांचेही आरोग्य जपले जाईल आणि सणाचा खरा आनंद अनुभवता येईल.

शरीरात साचलेली सर्दी होईल गायब! १० मिनिटांमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण चटणी, नोट करून घ्या रेसिपी

 

Web Title: Pollution increases during diwali what precautions should pregnant women take

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 03:20 AM

Topics:  

  • Diwali 2025
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा ‘हे’ बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स
1

Diwali 2025: दिवाळीत झकास फोटो काढायचे आहेत? आजच खरेदी करा ‘हे’ बेस्ट कॅमेरावाले स्मार्टफोन्स

Diwali 2025 मध्ये Electric Car खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 गाड्यांचा नक्की विचार करा
2

Diwali 2025 मध्ये Electric Car खरेदी करण्याचा विचार करताय? ‘या’ 5 गाड्यांचा नक्की विचार करा

Diwali 2025: दिवाळीच्या मुहूर्तावर Vi घेऊन आलाय एक धमाकेदार प्लॅन, 300GB हाय-स्पीड डेटासह मिळणार Disney+ Hotstar चे सबस्क्रीप्शन
3

Diwali 2025: दिवाळीच्या मुहूर्तावर Vi घेऊन आलाय एक धमाकेदार प्लॅन, 300GB हाय-स्पीड डेटासह मिळणार Disney+ Hotstar चे सबस्क्रीप्शन

‘हा’ प्रसिद्ध अभिनेता दिवाळी साजरी करत नाही, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ”आता फटाक्यांच्या आवाजाचीही भीती वाटते.”
4

‘हा’ प्रसिद्ध अभिनेता दिवाळी साजरी करत नाही, व्हिडिओ शेअर करत म्हणाला, ”आता फटाक्यांच्या आवाजाचीही भीती वाटते.”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.