(फोटो सौजन्य: istock)
आपल्या रोजच्या आहारात आपण अनेक अशा अनहेल्दी पदार्थांचे सेवन करतो जे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे शरीर बाहेरून जरी चांगलं आणि निरोगी दिसत असलं तरी आतून मात्र ते खराब होत असतं ज्याची माहिती बऱ्याचदा आपल्यापर्यंत पोहचत नाही. आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. अनेकदा आपल्या शरीराच्या आतील नसांमध्ये पिवळी घाण साचून राहते जी साफ होणे गरजेचे आहे. याला कोलेस्ट्रॉल असे म्हटले जाते, हा यकृताद्वारे तयार होणारा एक चरबीयुक्त पदार्थ आहे. जेव्हा एलडीएल कोलेस्टेरॉल जास्त प्रमाणात वाढते आणि शरीर ते नियंत्रित करू शकत नाही, तेव्हा ते धमन्यांमध्ये काही ठिकाणी जमा होऊ लागते. एकाच ठिकाणी जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल जमा होण्यास प्लेक म्हणतात. यामुळे हृदयाकडे किंवा हृदयातून रक्त प्रवाह रोखू शकतो. यामुळे रक्त पंप करण्यासाठी हृदयावर दबाव वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
जेव्हा मृत्यूचा देवता ‘यमराज’ स्वतः मरण पावला… काय झालं पुढे? जाणून घ्या मृत्यूशी जोडलेली कथा
जर ही प्लेक मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागली तर यामुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह रोखला जाईल आणि यामुळे आपल्याला स्ट्रोकचे त्रास सहन करावा लागू शकतो. जेव्हा मेंदूची रक्तवाहिनी फुटते तेव्हा मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे हाय कोलेस्टेरॉल घातक ठरू शकते. आता ही समस्या दूर कारण्यासाठी आपल्या मेडिकलच्या महागड्या औषधांची गरज नाही तर तुम्ही घरीच एका सोप्या आणि घरगुती उपायांच्या मदतीने शरीरात वाढलेले आणि साचलेले कोलेस्ट्रॉल कमी करू शकता.
आहारतज्ज्ञ मानसी पडेचिया यांनी सांगितले की, आपल्या १४ वर्षांच्या करियरमध्ये त्यांनी हाय कोलेस्ट्रॉलचे हजारो रुग्ण पाहिले आहेत. ही समस्या भारतीय लोकसंख्येमध्ये अगदी सामान्य आहे. आहारतज्ज्ञ म्हणतात की बहुतेक लोकांचे कोलेस्ट्रॉल आहारातील लहान बदलांनी सुधारता येते. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर हे १००% ट्राय केलेले आणि टेस्ट केलेले पेय वापरून पहा.
या पेयाचे सेवन करा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.