
महिलांमध्ये का वाढतंय cervical cancer चे प्रमाण? गर्भाशयमुखाचा कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात 'या' चुकीच्या सवयी
गर्भाशय मुखाचा कॅन्सर कशामुळे होतो?
कॅन्सर होण्याची कारणे?
गर्भाशय मुखाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकून जाते. कारण कॅन्सर हा अतिशय गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. कॅन्सर झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे शरीराला कोणत्याही गंभीर आजाराची लागण होणार नाही, याची योग्य काळजी घ्यावी. महिलांमध्ये प्रामुख्याने गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कोणत्याही वयात गर्भाशयमुखाचा कॅन्सर होऊ शकतो. वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. पण या बदलांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. कायमच दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर होते.(फोटो सौजन्य – istock)
राज्य कर्करोग संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, गर्भाशयाचे कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याशिवाय महिला आरोग्यासंबंधित उद्भवणाऱ्या समस्यांकडे कायमच दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी झपाट्याने वाढू लागतात. बहुतांश रुग्ण कर्करोग चौथ्या स्टेजला गेल्यानंतर त्याचे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे जातात. मात्र यामुळे जीव वाचवणे सुद्धा कठीण होऊन जाते. तसेच काहीवेळा रुग्णाला आपला जीव सुद्धा गमवावा लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्यास कोणत्या चुकीच्या सवयी कारणीभूत ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार माहिती सांगणार आहोत.
गर्भाशयाचा कॅन्सर ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे होतो. वैयक्तिक शारिरीक स्वच्छता योग्यप्रकारे ठेवल्यास या आजारच धोका बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. त्यामुळे स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे.
अनेक महिला वर्षनुवर्षं गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात. सतत गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्यामुळे शरीराच्या आतील नाजूक अवयवांना हानी पोहचते. यामुळे कॅन्सरचा धोका सुद्धा वाढतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी, कमी वयात लग्न, असुरक्षित लैंगिक संबंध, कुपोषण इत्यादी गोष्टी गर्भाशयाचा कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात.
वयाच्या तिशीनंतर सर्वच महिलांनी स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण या दिवसांमध्ये शरीरात अनेक बदल होतात. याशिवाय प्रत्येक वर्षात आजारासंबंधीची चाचणी करून घ्यावी. तसेच कोणत्याही कारंणाशिवाय शरीरात बदल दिसू लागल्यास वेळीच दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करावेत. यामुळे आजाराची स्टेज कमी असताना योग्य ते उपचार होऊन जीव वाचेल. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. त्यामुळे या बदलांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
Ans: गर्भाशयाच्या मुखाच्या पेशींची असामान्य वाढ होणे म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. हा भाग गर्भाशयाला योनीशी जोडतो.
Ans: लैंगिक संबंधानंतर रक्तस्त्राव, मासिक पाळी वगळता रक्तस्त्राव
Ans: मुख्य कारण म्हणजे ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) संसर्ग.