Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नायरमधील बंद कॅथलॅब पुन्हा सुरू होणार, लॅब बंद असल्यामुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांवर आर्थिक बोजा

कॅथलॅब सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर नायर रुग्णालयातच तातडीचे हृदयविकार उपचार उपलब्ध होणार आहेत.शिवायउपचारासाठी होणारा विलंबही धोकादायक ठरत होता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 10, 2026 | 03:45 PM
नायरमधील बंद कॅथलॅब पुन्हा सुरू होणार, लॅब बंद असल्यामुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांवर आर्थिक बोजा

नायरमधील बंद कॅथलॅब पुन्हा सुरू होणार, लॅब बंद असल्यामुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांवर आर्थिक बोजा

Follow Us
Close
Follow Us:

पालिकेच्या नायर रुग्णालयात गेल्या काही काळापासून बंद असलेले कॅथलॅब सेवा पुन्हा लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे हृदयविकाराशी संबंधित गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई पालिका आयुक्तांनी दुरुस्ती कामासाठी मंजुरी दिली असून संबंधित कंपनीला तातडीने दुरुस्ती करण्याबाबत कळविण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कॅथलॅब सेवा बंद असल्यामुळे नायर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसारख्या महत्त्वाच्या उपचारांसाठी इतर पालिका रुग्णालयांत वळवावे लागत होते. तर काही रुग्णांना नाइलाजाने खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागत होती. यामुळे रुग्णांवर आर्थिक बोजा तर पडतच होता, शिवायउपचारासाठी होणारा विलंबही धोकादायक ठरत होता. कॅथलॅब सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर नायर रुग्णालयातच तातडीचे हृदयविकार उपचार उपलब्ध होणार आहेत. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर वेळेत उपचार करणे शक्य होणार असून अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात ही सुविधा निर्णायक ठरणार आहे. सध्या कॅथलॅब सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया आणि प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात असून, लवकरच प्रत्यक्ष सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Archana Puran Singh ‘या’ दुर्मिळ आजाराने त्रस्त! गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे

रोज १२ जणांची अँजिओग्राफी:

नायर रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात दररोज सरासरी ८ ते १२ रुग्णांची अँजिओग्राफी, तर २ अॅजिओप्लास्टी केल्या जातात. याशिवाय पेसमेकर बसवणे आणि हृदयाच्या झडपांशी संबंधित उपचारही येथे नियमितपणे केले जातात. मात्र कॅथलॅब बंद असल्याने उपचारांवर परिणाम होत आहे.

मुंबईतील हजारो रुग्णांना मिळाला दिलासा:

निर्णयामुळे मध्य मुंबईसह परिसरातील हजारो हृदयरुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी नायर रुग्णालयातील कॅथलॅबमध्ये शॉर्टसर्किटची घटना घडली होती.या शॉर्टसर्किटमुळे यंत्रणेचे काही महत्त्वाचे पार्ट खराब झाले होते. परिणामी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर बसवणे तसेच हृदयाशी संबंधित इतर उपचार बंद ठेवावे लागले होते.

बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? ‘हे’ उपाय केल्यास धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका

पालिका आयुक्तांची परवानगी मिळाली असून संबंधित कंपनीशी संपर्क साधण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी आवश्यक पार्ट मागवून तातडीने दुरुस्ती करून देण्याबाबत कंपनीला कळविण्यात आले आहे. लवकरच कॅथलॅब सेवा रुग्णांच्या सेवेत पुन्हा रुजू होईल, अशी माहिती डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता, नायर रुग्णालय यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The closed cath lab at nair hospital will be reopened the closure of the lab was causing a financial burden on heart patients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Health Updates
  • Heart Disease

संबंधित बातम्या

Archana Puran Singh ‘या’ दुर्मिळ आजाराने त्रस्त! गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे
1

Archana Puran Singh ‘या’ दुर्मिळ आजाराने त्रस्त! गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे

हाडे मजबूत ठेवण्यासाठी वयाच्या ३० व्या वर्षानंतर आहारात करा ‘या’ सुपरहेल्दी पदार्थांचा समावेश, कायमच राहाल तंदुरुस्त
2

हाडे मजबूत ठेवण्यासाठी वयाच्या ३० व्या वर्षानंतर आहारात करा ‘या’ सुपरहेल्दी पदार्थांचा समावेश, कायमच राहाल तंदुरुस्त

बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? ‘हे’ उपाय केल्यास धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका
3

बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? ‘हे’ उपाय केल्यास धुळीच्या अ‍ॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका

आयुष्यात कधीच होणार नाही Diabetes! दैनंदिन आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, रक्तातील साखर राहील नियंत्रणात
4

आयुष्यात कधीच होणार नाही Diabetes! दैनंदिन आहारात नियमित करा ‘या’ पदार्थांचा समावेश, रक्तातील साखर राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.