विजापूर: छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. करेगुट्टा जंगलात 20 हजार कोब्रा कमांडोंनी 1 हजार नक्षलवाद्यांना घेरले आहे. जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. आतापर्यंत 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा रखील दल, बस्तर फायटर्स, सीआरपीएफ, कोब्रा बटालियन यांच्याद्वारे करण्यात येत आहे.
या जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना प्राप्त झाली होती. त्यानंतर २० हजार जवानांनी या करेगुट्टा जंगलाला वेढा घातला. या जंगलात तब्बल 1000 नक्षलवादी असल्याची माहिती समोर येत आहे. कालपासून ही चकमक सुरू आहे. सुरक्षा दल ड्रोनच्या माध्यमातून ही कारवाई करत आहे.
आतापर्यंत पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. 20 हजार जवानांनी 1 हजार नक्षलवाद्यांना घेरले आहे. बीजापुर जिल्ह्यात देखील नक्षलवाद्यांशी चकमक सुरू आहे. उसुरपोळीस ठाण्याच्या क्षेत्रात सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात नक्षलवादी लपले असल्याचे समजते आहे. सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
सुरक्षा दल-नक्षलवाद्यांच्यात चकमक
छत्तीसगड सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी छत्तीसगड सीमेवर नक्षलग्रस्त भागात आपली शोध मोहीम आणि कारवाईचा वेग वाढवला आहे. या दरम्यान सुरक्षा दलाला मोठे यश प्राप्त झाले आहे. छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलांनी 25 लाख रुपये बक्षीस असलेल्या महिला नक्षलवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे.
सुरक्षा दलांनी या चकमकीत नक्षलवाद्यांकडून रायफल आणि शस्त्रे जप्त केली आहेत. सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक अजूनही सुरूच आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ही चकमक सुरू आहे. लवकरात लवकर हे ऑपरेशन पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी झालेल्या चकमकीत 22 नक्षलवादी ठार झाले आहेत.
Chhattisgarh Naxal Encounter: सुरक्षा दल-नक्षलवाद्यांच्यात चकमक; दंतेवाडामध्ये नेमकं घडतंय काय?
मंगळवारी दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. त्यापैकी माओवादी सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली होता, ज्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. यासोबतच घटनास्थळावरून इन्सास रायफल, ३०३ रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला.