छत्तीसगडमध्ये सुरक्षा दले आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (फोटो - सोशल मिडिया)
रायपूर: छत्तीसगड सीमेवर भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी छत्तीसगड सीमेवर नक्षलग्रस्त भागात आपली शोध मोहीम आणि कारवाईचा वेग वाढवला आहे. या दरम्यान सुरक्षा दलाला मोठे यश प्राप्त झाले आहे. छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलांनी 25 लाख रुपये बक्षीस असलेल्या महिला नक्षलवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे.
सुरक्षा दलांनी या चकमकीत नक्षलवाद्यांकडून रायफल आणि शस्त्रे जप्त केली आहेत. सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात चकमक अजूनही सुरूच आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ही चकमक सुरू आहे. लवकरात लवकर हे ऑपरेशन पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी झालेल्या चकमकीत 22 नक्षलवादी ठार झाले आहेत.
मंगळवारी दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. त्यापैकी माओवादी सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली होता, ज्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. यासोबतच घटनास्थळावरून इन्सास रायफल, ३०३ रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला.
सुकमामध्ये १६ नक्षलवादी ठार
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज सकाळपासून नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत सुरक्षा दलांशी सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही चकमक सुकमा जिल्ह्यातील केरळपाल पोलिस स्टेशन परिसरात होत आहे. या वर्षी आतापर्यंत ११६ हून अधिक माओवादी मारले गेले आहेत. छत्तीसगडमधील सुकमा आणि दंतेवाडा सीमावर्ती भागात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सतत गोळीबार सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत माओवाद्यांना मोठे नुकसान झाले असून १६ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांकडून परिसरात चकमक आणि शोध मोहीम सुरू आहे.
Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये आणखी एक चकमक; सुकमामध्ये १६ नक्षलवादी ठार तर २ सैनिक जखमी
या चकमकीत सुरक्षा दलांनी १६ नक्षलवाद्यांना ठार मारल्याचे वृत्त असून दोन सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळपाल पोलिस स्टेशन परिसरातील जंगलात ही चकमक झाली, जिथे सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी बाहेर होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) चे कर्मचारी या कारवाईत सहभागी आहेत. या भागात माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली.