हैदराबादहू रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. चेन्नईला जाणाऱ्या चारमिनार एक्स्प्रेसच्या तीन बोगी तेलंगणातील नामपल्ली रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून ( charminar express derails) घसरल्या. या घटनेत सुमारे 5 जण जखमी झाल्याची माहिती आहे. बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चारमिनार एक्स्प्रेस नामपल्ली स्थानकाजवळ थांबत असताना हा अपघात झाला. त्यावेळी दरवाजाजवळ उभे असलेले पाच जण जखमी झाले. या अपघातात अन्य कुठलीही हानी झाल्याची माहिती नाही.
[read_also content=”प्रभासच्या ‘सालार’ची प्रेक्षकांमध्ये क्रेझ कायम, बॅाक्स ऑफिसवर अठराव्या दिवशी कमावले 2.4 कोटी! https://www.navarashtra.com/movies/salaar-box-office-collection-day-18-is-2-4-crore-nrps-496556.html”]
दक्षिण मध्य रेल्वेच्या सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, डबे रुळावरून घसरले आणि त्यावेळी ट्रेनच्या दाराजवळ उभे असलेल्या लोकांना किरकोळ दुखापत झाली. सर्व जखमींना रेल्वे रुग्णालयात पाठवून उपचार करण्यात आले आहेत. ट्रेन थांबण्याच्या प्रक्रियेत असताना काही बोगी प्लॅटफॉर्मवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातानंतर नामपल्ली रेल्वे स्थानकावरून अनेक रेल्वे सेवा बदलण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी प्रकरणाची चौकशी केली जात आहे.






