
आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर माहिती दिली की , "अत्यंत उच्च प्रदूषण पातळीमुळे, दिल्लीतील प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील.
नवी दिल्ली: नवी दिल्लीत (New Delhi School) गेल्या दोन आठवड्यांपासून वायू प्रदूषणामुळे (Pollution) दिल्लीतील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आजही हवा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये दिल्ली सरकारने आता सर्व खासगी आणि सरकारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर प्राथमिक शाळांमधील मुलांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू राहतील, तर उच्च वर्गातील मुलांसाठी संबंधित शाळा आपापल्या परीने आवश्यक निर्णय घेऊ शकतील.
या संदर्भात दिल्लीचे शिक्षण मंत्री आतिशी यांनी आज म्हणजेच रविवारी घोषणा केली की, राष्ट्रीय राजधानीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती दिली की , “अत्यंत उच्च प्रदूषण पातळीमुळे, दिल्लीतील प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. “इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्याचा पर्याय देण्यात आला आहे.”
दिल्लीत रविवारी सलग सहाव्या दिवशी विषारी आणि दाट धुके राहिले आणि वाऱ्याच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे, विशेषत: रात्रीच्या वेळी मंद वाऱ्याचा वेग यामुळे प्रदूषणाची पातळी पुन्हा एकदा ‘अत्यंत गंभीर’ श्रेणीत पोहोचली आहे.
हवेचा दर्जा निर्देशांक शनिवारी दुपारी 4 वाजता 415 वरून रविवारी सकाळी 7 वाजता 460 पर्यंत वाढला. याआधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा ३ आणि ४ नोव्हेंबरला बंद ठेवण्याची घोषणा केली होती.
त्याचबरोबर दिल्ली आणि परिसरातील लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी अँटी स्मॉग गनचा वापर करूनही प्रदूषणात कोणतीही घट झालेली नाही. याशिवाय पंजाबमधील अनेक शेतात जाळल्यामुळे राज