जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन
२ वर्षांत १८ किलो वजन कमी
तरुणीने सांगितले की, वेट लाॅस जर्नी सुरु केली तेव्हा तिचे वजन ८५ किलो होते. अभ्यास आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे तिला नियमितपणे जिमला जाता येत नव्हते अशात हळूहळू वर्कआउट करुन तिने आपले वजन कमी केले. साधारण दोन वर्षांच्या मेहनतीनंतर तरुणीने आपले १८ किलो वजन कमी केले. आता तिचे वजन ८५ हून ६७ वर आले आहे. तिने सांगितले की, यात कोणत्याही शाॅर्टकटचा समावेश नव्हता तर रोज केलेली मेहनत आणि लाईफस्टाईलमध्ये केलेले बदल यामुळे वजन कमी करण्यास तिला मदत झाली.
डाएट आणि वर्कआउट प्लॅन
१८ वर्षांच्या या तरुणीने आपल्या त्या काही सवयी शेअर केल्या ज्यामुळे तिला वजन कमी करण्यास मदत झाली. तिने सर्वात आधी साखरेयुक्त गोड साॅफ्ट ड्रिंक्स, प्रोसेस्ड फूड आणि बाजारातील तेलकट पदार्थ खाणे टाळले. या वेट लाॅस जर्नीत ती घरीच आपल्यासाठी हेल्दी जेवण बनवू लागली. तिने आपल्या आहारात अंडी, पनीर, मसूर, चणे आणि हरभरा यांचा समावेश केला. तिने फार स्ट्रीक्ट डाएट फाॅलो केला नाही तर फक्त जेवणाची मात्रा मर्यादित केली, अतिसेवन टाळले.
कोणता वर्कआउट रुटीन फाॅलो केला?
तरुणीने सांगितले की, ती रोज सकाळी १६००० ते १७०० कॅलरिज घेत असे आणि कमीतकमी १०० ग्रॅम प्रोटीन्सचा आहारात समावेश करत असे. तिने खास डाएट फाॅलो केला नाही तर रोज घरी बनवलेल्या जेवणाचे ती सेवन करायची. आपल्या आवडीचे पदार्थ जसे की, पनीर, डाळ, अंडी यातून तिचा प्रथिनांचा साठा पूर्ण व्हायचा.
डेसी वर्कआउट रुटीन
तरुणीने सांगितले की, आपल्या आहारात तिने साधारण ३ लीटर पाण्याचा समावेश केला. हळूहळू तिला इतक्या प्रमाणाची सवय झाली. पाण्याचे सेवन पोट भरुन ठेवण्यास आणि शरीराला हायड्रेट करण्यास मदत करते.
Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स
पुरेशी झोप आणि विश्रांती
तरुणीची मान्यता होती की, वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट आणि व्यायाम करणे महत्त्वाचे नाही तरी पुरेशी झोप आणि विश्रांतीही तितकीच महत्त्वपूर्ण ठरते. शरीराला रिकव्हर होण्यासाठी थोड्या आरामाचीही गरज असते.