राजस्थानमध्ये मोठी दुर्घटना; बनास नदीत बुडून ८ तरुणांचा मृत्यू
राजस्थानमधील टोंक शहारात मोठी दुर्घटना घडली आहे. जयपूरहून पिकनिकसाठी गेलेल्या ८ तरुणांचा बनास नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व मृत तरुण २० ते ३० वर्षांच्या दरम्यान आहेत. कदाचित तरुणांना पोहता येत नव्हतं किंवा एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात बुडाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
धक्कादायक! ऑस्ट्रियात शाळेत विद्यार्थ्याकडून अंदाधुंद गोळीबार; 9 जणांचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. पोहोचून स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. मृतांमध्ये नौशाद (३५), कासिम, फरहान ( तिघंही हसनपुरा येथील रहिवासी), रिजवान (२६, घाटगेट ), नवाब खान (२८, पानीपेच), बल्लू (घाटगेट ), साजिद (२०, पाणीपेच), रामगंज बाजार येथील रहिवासी नवीद (३०) चा समावेश आहे.
Rajasthan | Eight people have died, three injured due to drowning in the Banas river in Tonk district, confirms SP Tonk Vikas Sangwan https://t.co/80TBY4xuOS
— ANI (@ANI) June 10, 2025
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ईद सण साजरा केल्यानंतर, मंगळवारी जयपूर येथील ११ जण टोंक बनास नदीवर पिकनिकसाठी आले होते. त्यापैकी तीघे नदीच्या काठावर जेवण बनवत होते. बाकीचे ८ जण बनास नदीत अंघोळीसाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडाले, यावेळी काठावर असलेल्या लोकांनी आरडाओरडा केला. यानंतर काही लोकांनी धाडस दाखवून तरुणांना बाहेर काढलं, पण तोपर्यंत वेळ झाला होता. ८ ही तरुणांचा बुडून मृत्यू झाला.
Akkalkot Accident : अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची धडक, 3 जणांचा जागीच मृत्यू
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडिया ‘X’ वर लिहिले – टोंक जिल्ह्यात असलेल्या बनास नदीत बुडून तरुणांच्या मृत्यूची बातमी खूप वेदनादायक आहे. घटनेची माहिती मिळताच, जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बचाव आणि मदत कार्य हाती घेण्याचे निर्देश देण्यात आल्यांचं त्यांनी सांगितलं आहे.