अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची धडक, ३ भाविकांचा मृत्यू
सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असून यात तीन भाविकांचा मृत्यू आल्याची माहिती आहे. तर १५-२० भाविक जखमी झाले आहेत. त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान ट्रॅव्हल्स बसमध्ये ३५ प्रवाशी असल्याची माहिती असून सर्व भाविक पुण्याहून अक्कलकोटला देवदर्शनाला जात असताना ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुण्याहून ३० ते ३५ जण ट्रॅव्हल्सने अक्कलकोटला देवदर्शनासाठी जात होते. दरम्यान सोलापूर अक्कलकोट महामार्गावर असताना बसने ट्रकला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. यात तीन भाविकाचा जागीच मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
Delhi Fire News: मोठी बातमी! दिल्लीत इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी वडिलांनी २ मुलांसह थेट…
अपघातानंतर स्थानिक स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून जखमींना बाहेर काढण्यात आलं. जखमींना अक्कलकोट आणि सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात करण्यात दाखल करण्यात आले. मात्र मृतांमध्ये काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे, त्यामुळे मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातानंतर सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली.