
गेल्या काही दिवसापासून देशभरात विविध अपघाताच्या घटना घडत असल्याचं समोर येत आहे. शुक्रवारी ओडिसामध्ये दुर्देवी घटना घडली होती. ओडिशातील झारसुगुडा येथे महानदीत बोट उलटून (Odisha Boat Capsized) 7 जणांचा मृत्यू झाला. तर शनिवारी राजस्थानमध्ये एक भीषण अपघात झाल्याचं समोर येत आहे. राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यात एका वेगवान ट्रॉलीने व्हॅनला धडक दिली. या अपघातात (Rajasthan Accidenr News) 9 जणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
[read_also content=”‘माझ्यावर प्रँक करण्यात आला’, प्लॅस्टिक सर्जरीच्या अफवांवर अखेर बोलला राजकुमार! बदललेल्या लूकचं सांगितलं सत्य! https://www.navarashtra.com/movies/rajkummar-rao-open-up-about-the-plastic-surgery-rumours-nrps-525609.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात भोपाळ मार्गावर हा अपघात झाला आहे. मध्य प्रदेशातील डुंगरी येथे एका लग्न समारंभात सहभागी होऊन दुगरगाव येथील आपल्या घरी परतत असताना काही लोकांच्या मारुती व्हॅनला एका ट्रॉलीने धडक दिली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, धडकेनंतर व्हॅनचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना याची सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
अकलेरा पोलिस स्टेशनचे प्रभारी संदीप बिश्नोई यांनी सांगितले की, पोलिस स्टेशनपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भोपाळ रोडवर हा अपघात झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून व्हॅनमध्ये अडकलेल्या जखमींना जवळच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. जिथे तपासणीनंतर डॉक्टरांनी 9 जणांना मृत घोषित केले. तर एका जखमीवर उपचार सुरू आहेत.