Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Building Collapse: Big Breaking!!! राजधानीत मोठी दुर्घटना! 5 मजली इमारत अचानक कोसळली; ५० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

Delhi Building Collapse: राजधानी दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरातील सत्य निकेतन येथे रविवारी पाच मजली इमारत अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. या इमारतीत विद्यार्थ्यांचे हॉस्टेल असल्याचे सांगितले जात असून, ५० हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 06, 2026 | 03:29 PM
Delhi Building Collapse: Big Breaking!!! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Delhi Building Collapse: Big Breaking!!! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील सत्य निकेतनमध्ये ५ मजली इमारत कोसळली
  • ५० हून अधिक विद्यार्थी अडकल्याची भीती
  • पोलीस आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन
Delhi Building Collapse News: राजधानी दिल्लीतून एक अतिशय धक्कादायक आणि भीतीदायक बातमी समोर येत आहे. दिल्लीच्या चाणक्यपुरी भागातल्या सत्य निकेतन परिसरात आज रविवारी एक पाच मजली इमारत अचानक कोसळली. या घटनेमुळे पूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. इमारत पडली आहे या इमारतीत मुलांचं हॉस्टेल होतं असं सांगितलं जातं आहे. त्यामुळे या ढिगाऱ्याखाली 50 पेक्षा जास्त विद्यार्थी अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.Delhi Building Collapse:

घटनेची माहिती मिळताच

पोलिस अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. बचाव पथकाकडून ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी स्थानिक लोकांची पण मोठी गर्दी जमली असून सगळे लोक बचाव पथकाला मदत करत आहेत. हाताने ढिगारा हटवून आत कोणी अडकलंय का हे बघितलं जात आहे.

या दुर्घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अजून जास्त टीमला पाचारण करण्यात आलं आहे.सत्य निकेतन हा परिसर दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसजवळ आहे. त्यामुळे इथे बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्यांचे हॉस्टेल आणि पीजी आहेत. जी इमारत कोसळली ती जुनी होती की नव्याने बांधलेली होती, याबद्दल अजून माहिती समोर आलेली नाही.

काँग्रेस आणि NSUI चा सरकारवर हल्लाबोल

या दुर्घटनेनंतर राजकारण पण सुरू झालं आहे. काँग्रेसने या घटनेवरून सरकारवर संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करून चिंता व्यक्त केली आहे.NSUI ने म्हटलं आहे की, “दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसजवळ सत्य निकेतनमध्ये इमारत कोसळल्याची बातमी खूपच चिंताजनक आहे.

देशात वीज संकटाचा बसणार शॉक; अवघा 9 दिवसांचा कोळसा शिल्लक, वीज केंद्रांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी साठा

ढिगाऱ्याखाली दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी अडकल्याची माहिती येत आहे.”ते पुढे म्हणाले की, “विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने आणि सरकारने ताबडतोब युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करावं. प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित बाहेर काढावं. आणि या घटनेची निष्पक्ष चौकशी करून ज्यांची चूक आहे त्यांच्यावर कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं खपवून घेतलं जाणार नाही.”

दिल्ली विश्वविद्यालय के साउथ कैंपस के पास सत्य निकेतन में हुई यह घटना बेहद चिंताजनक है। DU के छात्रों के मलबे में दबे होने की खबरें सामने आ रही हैं। केंद्र में BJP की सरकार है, दिल्ली में BJP की सरकार है और MCD में भी BJP का मेयर है। जब सत्ता और प्रशासन की जिम्मेदारी हर स्तर… pic.twitter.com/5bjZDOaJ1T — NSUI (@nsui) September 6, 2026

इमारत कशी कोसळली?

अजून या दुर्घटनेचं नेमकं कारण कळलेलं नाही. पण प्राथमिक माहितीनुसार इमारत खूप जुनी असावी किंवा तिच्या बांधकामात काहीतरी गडबड असावी असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत होता, त्यामुळे इमारतीच्या पायाला पाणी लागून ती कमकुवत झाली असावी.परंतू ही माहिती चौकशीनंतरच समोर येईल.

देशभरात 11 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता; नेपाळनंतर आता उत्तराखंडसह हिमाचल प्रदेशात पूर येणार?

सध्या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढणं. संपूर्ण देशाचं लक्ष आता दिल्लीतल्या या बचावकार्याकडे लागलं आहे. देवाकडे प्रार्थना आहे की सगळे विद्यार्थी सुरक्षित बाहेर येतील.या घटनेमुळे दिल्लीतील जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती, असंही काही लोक म्हणत आहेत.

 

Web Title: A five story building suddenly collapsed in delhi more than 50 students are trapped under the debris

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • building collapse
  • Delhi news
  • international news

संबंधित बातम्या

Video : दिल्ली विमानतळावरच साचले पावसाचे पाणी; चालणेही झाले अवघड, प्रवाशांची मोठी गैरसोय
1

Video : दिल्ली विमानतळावरच साचले पावसाचे पाणी; चालणेही झाले अवघड, प्रवाशांची मोठी गैरसोय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.