मुलांनो लग्न करताय? मग 'ही' बातमी वाचाच: सुटकेसमध्ये मृतदेह ठेवला, सिमेंट भरले अन्...,
रायपूर: नुकतेच आपण उत्तर प्रदेशमध्ये एका मोठ्या हत्याकांडाविषयी वाचले असेलच. प्रियकरायच्या मदतीने बायकोने आपल्या नवऱ्याला संपवले होते. उत्तर प्रदेशमधील सौरभ हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला होता. सौरभची बायको मुस्कान आणि तिचा प्रियकर यांनी मिळून नवऱ्याला ठार मारले. त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि निळ्या ड्रममध्ये भरले. त्यावर सिमेंट लावून टाकले. आता अशीच एक घटना छत्तीसगडच्या रायपूरमधून समोर आली आहे. नक्की हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये विचित्र घटना घडली आहे. रायपूर येथील डीडी पोलिस ठाण्याच्या परिसरात एक उत्तर प्रदेशसारखीच घटना घडली आहे. डीडी परीसरात सुटकेसमध्ये मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे ही उत्तर प्रदेशसारखीच घटना नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र या मृतदेहाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
रायपूरच्या डीडी पोलिस स्टेशन परिसरात एका सुटेकसमध्ये मृतदेह आढळून आला आहे. एका रिकाम्या जागेवर एक पेटी आढळून आली आहे. बेवारस स्थितीत असणाऱ्या पेटीमध्ये नागरिकांनी उघडून पाहिले असता, त्यात एक सुटकेस लपवण्यात आली होती. त्या सुटकेसमध्ये सिमेंट भरण्यात आले होते. ते सिमेंट काढले असतं त्यात तुकडे करून भरलेला मृतदेह दिसून आला.
Meerut Murder Case : तुरुंगातील मुस्कान रस्तोगी आता आई होणार, मुलाचा बाप कोण यावर प्रश्नचिन्ह
त्या सुटकेसमध्ये कुजलेला मृतदेह आढळून आल्याचे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेहाचे तुकडे करून तो सुटकेसमध्ये भरण्यात आला होता. तसेच तो मृतदेह सिमेंटमध्ये गोठवण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम त्या ठिकाणी दाखल झाली. फॉरेन्सिक टीम देखील त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी तपास सुरू केला आहे.
मृतची ओळख अद्याप पटू शकलेली नाहीये. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम संयुक्तपणे तपास करत आहेत. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच हा गुन्हा आणि यामगचे प्रकरण नक्की काय? याचा शोध घेतला जात आहे. मृतदेहाची ज्या पद्धतीने वाट लावली आहे, त्यानुसार हा एक पूर्वनियोजित खून असल्याची शंका आहे.
काय होते मेरठ हत्याकांड?
मुस्कानने ४ मार्च रोजी सौरभच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. सौरभ झोपी गेल्यानंतर, मुस्कान आणि साहिलने त्याच्यावर चाकूने वार केले. शरीराचे तुकडे करण्यात आले. त्यांचे एकूण १५ तुकडे केल्यानंतर, ते एका ड्रममध्ये भरले गेले आणि सिमेंटने सील केले. दोघांनीही योग्य वेळी मृतदेह कुठेतरी फेकून देण्याची योजना आखली होती. मुस्कानने शेजाऱ्यांमध्ये अफवा पसरवली की ती तिच्या पतीसोबत मनाली या हिल स्टेशनला भेट देणार आहे. पण ती तिचा खुनी प्रियकर साहिलसोबत गेली. तिथून मुस्कान सौरभच्या फोनवरून तिचे फोटो शेअर करत राहिली. हे अशासाठी केले गेले की लोकांना वाटेल की सौरभ जिवंत आहे आणि हसतमुख फोटो शेअर करत आहे. पण जेव्हा सौरभच्या कुटुंबाने त्यांच्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा फोन आला नाही. हे सतत घडत राहिल्यानंतर कुटुंबाने पोलिसांशी संपर्क साधला. कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुस्कान आणि साहिलला ताब्यात घेतले. पोलिसांच्या दबावामुळे दोघेही तुटून पडले आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.