Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपला तुरुंगात करायची आहे मनिष सिसोदियांची हत्या, आपच्या नेत्यांच्या आरोपामुळे उडाली खळबळ

मनिष सिसोदियांना तिहारमधल्या क्रमांक १ च्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. कारण भाजपाला तुरुंगातच त्यांची हत्या घडवून आणायची असल्याचा गंभीर आरोप भारद्वाज यांनी केला आहे.

  • By साधना
Updated On: Mar 08, 2023 | 07:07 PM
manish sisodiya

manish sisodiya

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली: दिल्लीतल्या मद्य धोरण प्रकरणी(Liquor Scam) उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांना (Manish Sisodia Arrest) तुरुंगात जावं लागलं आहे. मात्र या प्रकरणात आता रोज आरोप प्रत्यारोप होत आहेत. आम आदमी पार्टीचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी मनिष सिसोदियांच्या अटकेप्रकरणी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मनिष सिसोदियांना तिहारमधल्या क्रमांक १ च्या तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. कारण भाजपाला तुरुंगातच त्यांची हत्या घडवून आणायची असल्याचा गंभीर आरोप भारद्वाज यांनी केला आहे.

सौरभ भारद्वाज काय म्हणाले ?
तिहारच्या तुरुंग क्रमांक १ मध्ये फर्स्ट टाइम अंडर ट्रायल कैद्याला ठेवलं जात नाही. कारण या क्रमांक १ च्या तुरूंगात भयंकर क्रूर असे कैदी आहेत. हे कैदी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि मनोरूग्ण झालेले आहेत. एका छोट्याश्या इशाऱ्यावर ते कुणाचीही हत्या करू शकतात. अशा लोकांमध्ये मनिष सिसोदियांना ठेवण्यात आलं आहे. आम्ही भाजपाचे राजकीय विरोधक आहोत. पण अशा प्रकारचं शत्रुत्व कधी तुम्ही राजकारणात पाहिलं आहे का? भाजपा दिल्लीत आमचा पराभव करू शकली नाही त्यामुळे आता ते आमचा असा बदला घेणार का? असाही प्रश्न सौरभ भारद्वाज यांनी विचारला आहे. तसंच पंतप्रधान या सगळ्या प्रकरणात गप्प का बसले आहेत? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

कोर्टाने मनिष सिसोदियांना विपश्यना सेलमध्ये ठेवण्याची संमती दिली आहे. त्यांना तिथे न ठेवता क्रमांक एकच्या सेलमध्ये का ठेवण्यात आलं आहे? मनिष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांची राजकीय हत्या भाजपाला घडवून आणायची आहे का? सौरभ भारद्वाज यांनी ही टीका केलीच त्यानंतर आपचे खासदार संजय सिंह यांनीही भाजपावर टीका केली.

छाप्यात काहीही मिळालं नाही – संजय सिंह
ज्या मद्य धोरणाच्या अंतर्गत आणि घोटाळ्याच्या अंतर्गत मनिष सिसोदियांना तुरुंगात धाडण्यात आला आहे त्या कथित घोटाळ्याचे हात, पाय, धड, शीर काहीही नाही. तरीही मनिष सिसोदियांच्या घरी छापेमारी करण्यात आली. त्यांच्या गावात, त्यांच्या बँक खात्यांवर छापा मारण्यात आला. त्यामध्ये कुणालाही काहीही मिळालं नाही. दोन आरोपपत्रं दाखल केली गेली मात्र त्यात मनिष सिसोदियांचं नावही नव्हतं. आता मनिष सिसोदियांना अत्यंत क्रूर म्हणता येतील अशा कैद्यांसोबत ठेवलं गेलं आहे. तुरुंगात त्यांची हत्या घडवून आणायची हे भाजपाचं षडयंत्र आहे का? हा प्रश्न संजय सिंह यांनीही विचारला आहे.

पुढे संजय सिंह म्हणाले की कर्नाटकात भाजपाच्या आमदाराच्या घरी ८ कोटी रूपये सापडले. त्याच्या घरी कुठलीही ईडी किंवा सीबीआय गेली नाही. भाजपा आमदाराच्या मुलाला तातडीने जामीन मिळाला. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारायचं आहे की तुम्ही आणि तुमच्या पक्षात एवढा अहंकार आणि एवढा तिरस्कार का भरला आहे? असंही संजय सिंह यांनी म्हटलं आहे.

Web Title: Aam admi party saurabh bharadwaj and sanjay singh comment about bjp nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2023 | 07:05 PM

Topics:  

  • AAP
  • Manish Sisodia
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
1

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण
2

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात
3

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
4

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.