
फोटो सौजन्य सोशल मीडिया
कारण इराणने योग्य रणनीती आणि योग्य शस्त्राचा योग्य वापर केल्यामुळे हे शक्य झाले आहे . या सगळ्यात इराणची भौगोलिक परिस्थितीही इराणला साथ देत आहे . पूर्वीसारखे युद्ध हे फक्त जीवितहानीवर मोजले जात नाही . आता राजकीय , सामाजिक, व्यापार , सार्वजनिक मालमत्ता ,सोशल मीडिया इत्यादी अनेक बाबींवर युद्धाचे कल मोजले जातात . या युद्धात इराणने बऱ्यापैकी सगळ्याच पातळ्यांवर अमेरिकेला चांगलाच लढा दिला .
तेव्हा अमेरिकेने होर्मूझवर ब्लॉकेड करून इराणच्या होर्मूझ बंदच्या चालीवर चाल खेळून इराणची गोची केली . पण याचे परिणाम इराण सोबत अमेरिकेलाही भोगावे लागले . जसे कि अमेरिकेने एअर क्राफ्ट शिप हॊर्मूझच्या दारावर ठेवल्यामुळे तैवानवरील सैन्य होर्मूझवर बोलावण्यात आले .बऱ्याच काळापासून समुद्रात असल्यामुळे अमेरिकेच्या सैन्याची मानसिक स्थिती बिघडून सैनिकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला . तेव्हा होर्मूझ काही काळासाठी सैल करण्यात आला . असे मिळालेल्या माहितीवरून समजते आहे .
Airplane Fight : हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
आधीच बरीच वर्ष झालीत अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादले . त्यानंतर युद्धात इराण हारला नसल्याने अमेरिकेने पुन्हा आर्थिक आणि तेल विक्रीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे . यामुळे इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी सांगितले कि जर अमेरिका आमच्यावर दबाव टाकून आमच्या तेल विक्रीस अढथळा आणत असेल तर पूर्ण आखातात आम्ही एकालाही तेल विक्री करून देणार नाही .
मध्य पूर्वेतील देशांसाठी तेल व्यवसाय हा मोठा आणि सगळ्यात महत्वाचा व्यवसाय आहे . तेलवाहतुकीसाठी तसेच इतर वस्तूंच्या व्यापारासाठी होर्मूझ हा खूपच महत्वाचा मानला जातो . २० टक्के जगाची मालवाहतूक ही होर्मूझमधून होत असते . आणि हाच होर्मूझ इराणच्या दुश्मनांच्या दुर्दैवाने पूर्णपणे इराण आणि ओमानच्या नियंत्रणात आहे . कारण या दोन देशांच्या मधून होर्मूझ मधला जलप्रवासाचा मार्ग आहे . या सगळ्यामुळे होर्मूझ हा अत्यंत महत्वाचा झालेला आहे .
सध्याची परिस्थिती पाहता इराणला तर अर्थातच युद्ध संपवून आपली आर्थिक स्थिरता वाढवायची आहे . तसेच अमेरिकेत मध्य पूर्व निवडणुका लागल्या असल्याने ट्रूम्प यांना हे युद्ध सुरूच ठेवावे लागणार आहे . कारण हे युद्ध नाही इराणने झिंकले आहे ना कि अमेरिकेने जर इराणच्या मागण्या मान्य करून शांतता प्रस्ताव मान्य केला तरी अमेरिकेला हरत आहे.आणि युद्ध सुरूच ठेवले तरी जीवितहानी आणि आर्थिक नुकसान या आघाड्यांवर सुद्धा ट्रम्प यांना नुकसानच हातात मिळत आहे .
आणि हे अमेरिकेतील निवडणुकांसाठी ट्रम्प यांना परवडणारे नाही . त्यामुळे ट्रम्प हे युद्ध ना थांबू देतील ना कायम सुरु ठेवतील अशी परिस्थिती झालेली आहे . त्यात ट्रम्प यांचा स्वभाव बघता हे युद्ध कधी थांबेल हे कोणच ठामपणे सांगू शकत नसल्याचे बोलले जात आहे .