
AAP accusation Tribal funds used for BJP campaign for narendra modi in Gujarat
‘आप’ नेत्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आहे. आप नॅशनल मीडिया इंचार्ज अनुराग ढांडाने गंभीर आरोप केले आहेत. मोदी सरकारने प्रचारासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली आहे. मात्र हे पैसे देखील भाजपच्या खिशातील नाही आदिवासींच्या हक्काचे असल्याचा दावा आपकडून करण्यात आला आहे. यामध्ये प्रचारामधील सभांसाठी उभारण्यात येणाऱ्या मांडवांसाठी 7 कोटी, तर त्यावर ३ कोटी रुपयांचा घुमट आणि २ कोटी रुपयांचा चहा आणि समोसे अशी पैशांची उधळण केली आहे. या बेहिशोबी खर्चामुळे आपने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
हे देखील वाचा : काँग्रेसची आघाडी, भाजप दुसऱ्या क्रमांकावर; दर्यापुरात १६ जागांवर काँग्रेस विजयी
पंडाल, घुमट, चहा आणि समोसे यावर किती खर्च?
आदिवासी निधीतून झालेल्या खर्चाची माहितीही देण्यात आली. अनुराग म्हणाले, “डेडियापाडा येथील मोदींच्या कार्यक्रमासाठी ७ कोटी रुपयांचा पंडाल उभारण्यात आला. एका घुमटासाठी ३ कोटी रुपये खर्च आला. एका स्टेजसाठी ५ कोटी रुपये, चहा आणि समोसे यासाठी २ कोटी रुपये, लोकांना एकत्र येण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यासाठी ७ कोटी रुपये आणि शौचालये आणि साफसफाईसाठी २ कोटी रुपये खर्च आला आहे.” अशी माहिती आपने दिली.
गुजरात में आदिवासियों के हक के पैसों को मोदी जी के प्रचार पर उड़ा रही बीजेपी सरकार‼️ pic.twitter.com/TioirpnaEO — AAP (@AamAadmiParty) December 22, 2025
पंतप्रधानांच्या निवासस्थानावर किती खर्च होत आहे?
आप नेते सौरभ भारद्वाज म्हणाले, “सेंट्रल व्हिस्टामध्ये बांधल्या जाणाऱ्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर किती पैसे खर्च होत आहेत हे विचारण्यासाठी एक आरटीआय अर्ज दाखल करण्यात आला होता. हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्याचे सांगण्यात आले होते.” अरविंद केजरीवाल आणि मुख्यमंत्री निवासस्थानाच्या मुद्द्याचा संदर्भ देताना सौरभ भारद्वाज म्हणाले, “पण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात काय बसवले होते आणि काय बसवले नव्हते याची संपूर्ण माहिती मिळवण्यात आली होती. त्यावेळी कोणालाही सुरक्षेची चिंता नव्हती.” असा टोला त्यांनी लगावला,
१२,००० मुले कुपोषणाने ग्रस्त
मोदी सरकारकडून प्रचार सभांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पाण्यासारखा पैसा हा प्रचार आणि राजकीय गोष्टींसाठी उधळला जात आहे. मात्र देशामध्ये अनेक मुले कुपोषणग्रस्त आहेत. त्यांच्याकडे सरकारचे अजिबात लक्ष नसल्याचा दावा करण्यात आला आहे. आप खासदार संजय सिंह यांनी या विषयावर एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यांचे विचार व्यक्त केले. त्यांनी आरोप केला की सुमारे १२,००० मुले कुपोषणाने ग्रस्त आहेत. त्यांच्या कुपोषण कमी करण्यासाठी रुग्णालये आणि शाळा बांधण्यासाठी निधी पंतप्रधानांच्या रॅलीवर खर्च करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : भाजप आमदारांना कसला माज? मुंबईमध्ये रिक्षा चालकाला मारहाण, ठाकरे गट आक्रमक
सरकारने सांगितले की त्यांच्याकडे पैसे नाहीत…
संजय सिंह यांनी प्रश्न केला की, “या देशात काय चालले आहे? आदिवासी समुदायांना सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही का? जेव्हा आमच्या आमदाराने सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत विचारले की, तुम्ही बाल कुपोषण दूर करण्यासाठी पैसे का खर्च करत नाही?” तेव्हा तेथील भाजप सरकारने दावा केला की त्यांच्याकडे पैसे नाहीत. संजय सिंह म्हणाले, “ते पैसे पंतप्रधानांच्या रॅलींना जात आहेत.” असा आरोप आपने केला आहे. यावरुन आता जोरदार राजकीय वाद निर्माण झाला आहे.