'आप'चा मुख्यमंत्रिपदाचा चेहराही ठरला; निवडणुकीपूर्वी केजरीवालांची मोठी घोषणा
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा प्रचार तापताना पाहायला मिळत आहे. दरम्यान यंदा दिल्लीत भाजप, कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षात मुख्य लढत होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी (Delhi Assembly Elections) पोलिस आणि प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि तर ८ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
दिल्लीत निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यादरम्यान केजरीवाल यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप सत्तेत आल्यास सहा तासांची वीज कपात पुन्हा सुरू होईल. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आदर्शनगर मतदारसंघातील प्रचारसभेत बोलत होते. आज दिल्लीला 24 तास वीजपुरवठा होतो. 10 वर्षांच्या आधी सहा तास वीजपुरवठा खंडित केला जायचा.
अरविंद केजरीवाल म्हणाले, “देशातील 20 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तरी त्या कोणत्याच राज्यात 24 तास वीजपुरवठा केला जात नाही. निवडणुकीत तुम्ही चुकीचे बटण दाबले, तर दिल्लीत पुनः 6 तास वीजपुरवठा खंडित केला जाईल. तुम्ही कमळाचे बटण दाबले की तुम्ही घरी पोहोचेपर्यंत वीजपुरवठा खंडित होईल. गेल्या 10 वर्षांत दिल्लीसाठी काय केले हे ते कधीच सांगत नाहीत. केवळ माझ्यावर टीका करतात आणि मला वाईटसाईट बोलतात.
भाजपकडून जाहीरनामा -2 प्रसिद्ध
केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपने आपल्या जाहिरनाम्याचा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे. यामध्ये दिल्लीच्या नागरिकांना अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. भाजपने आपल्या जाहिरनाम्यातून केजी ते पिजी पर्यंत मोफत शिक्षण, तसेच ऑटो आणि कॅब चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबद्दल सांगण्यात आले आहे. तसेच भ्रष्टाचार रोखण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपच दिल्लीत सरकार स्थापन करेल असा विश्वास मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी दिल्लीतील तरुणांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. याशिवाय अनेक वचने भाजपने आपल्या जाहीरनामा 2 मध्ये दिल्लीच्या नागरिकांना दिली आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यातील पहिला भाग भाजपने जाहीर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ने जाहीरनामा प्रसिद्ध केला. आमची सत्ता आल्यास सध्या सुरू असलेल्या योजना बंद केल्या जाणार नाहीत, अंतर त्यातील भ्रष्टाचार संपवला जाईल असे नड्डा म्हणाले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात कोकोणती आश्वासने दिली आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.