Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bjp Politics : सोलापुर महापालिकेसाठी उमेदवार कोण ठरवणार? पालकमंत्री जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं

स्थानिक आमदार आणि भाजप शहराध्यक्ष हेच सर्व उमेदवार ठरवतील. मी एकही उमेदवार सुचविला नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 28, 2025 | 02:57 PM
सोलापुर महापालिकेसाठी उमेदवार कोण ठरवणार? पालकमंत्री जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं

सोलापुर महापालिकेसाठी उमेदवार कोण ठरवणार? पालकमंत्री जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं

Follow Us
Close
Follow Us:
  • सोलापुर महापालिकेसाठी उमेदवार कोण ठरवणार?
  • पालकमंत्री जयकुमार गोरेंनी स्पष्टच सांगितलं
  • दोन्ही देशमुखांनी दिला होता इशारा
सोलापूर : भाजपा हा पक्ष प्रचंड मजबूत पक्ष आहे. मोठ्या प्रमाणात निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. प्रत्येक आमदारांचे कार्यकर्ते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यामुळे घासाघाशी, नाराजी ही होणारच आहे. यामुळे चिंता नको. सर्व मिळून व्यवस्थित योग्य मार्ग काढू. महापालिकेच्या जागा वाटपा संदर्भात मी कधीही भाष्य केले नाही. स्थानिक आमदार आणि भाजप शहराध्यक्ष हेच सर्व उमेदवार ठरवतील. मी एकही उमेदवार सुचविला नाही, असे स्पष्टीकरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

आमदार विजयकुमार देशमुख यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय न मिळाल्यास ते ज्या पक्षात निवडणूक लढवतील तेथे त्यांचा प्रचार करण्यात येईल, असा निर्णय जाहीर केला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. अखेर आज एका हॉटेलमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पालकमंत्री गोरे म्हणाले, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. समन्वयक या नात्याने माझ्यावर नाराजी व्यक्त होणे साहजिक आहे. सर्वांच्या समन्वयाने चर्चेअंती योग्य मार्ग निघेल. जागा वाटपावर मी कधीही भाष्य केले नाही. सोलापूर महापालिकेचे सर्व उमेदवार स्थानिक आमदार आणि शहराध्यक्ष ठरवतील. माझा एकही उमेदवार मी सुचविला नाही. सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येणार आहे.

एकमेकांच्या मतदारसंघात जागांची मागणी करणे हे मुख्य कारण आहे, त्यावरही मार्ग निघेल. उमेदवारांच्या नावासंदर्भात ही चर्चा झाली. त्यातून सगळे मिळून निर्णय घेणार आहोत. भाजपा हा मजबूत पक्ष आहे. प्रत्येक आमदारांचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यामुळे नाराजी उमटणे साहजिक आहे. भाजपची ताकद प्रचंड आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. आम्ही सर्व मिळून व्यवस्थित मार्ग काढणार आहोत, असे पालकमंत्री म्हणाले.

महायुती करण्यासंदर्भातही स्थानिक आमदार आणि शहराध्यक्ष हेच निर्णय घेणार आहेत. जे काही चांगलं होईल ते आमदार आणि वेगळं काही झालं तर ते पालकमंत्र्यांनी केलं असं मानता येईल, असे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले. भाजपातील बहुतांश कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. राजकारणात गणिते बसवावी लागतात. राजकारण आणि युद्धात परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. बहुतांश उमेदवार हे निष्ठावंत कार्यकर्तेच असतील, असेही पालकमंत्री गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

महायुती होणार का या प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले, मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाने युती संदर्भात प्रस्ताव दिला नाही. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज नाही. शिवसेना शिंदे गटाने युतीचा प्रस्ताव दिला आहे. या सदर्भात आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा केली. मित्रपक्षाने ज्या जागा मागितल्या ते देणं शक्य आहे का याचाही विचार करण्यात येईल. महायुती करण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर रिपाइं आठवले पक्षानेही जागांची मागणी केली आहे. युती करीत असताना मित्रपक्ष कोणत्या जागा मागतात यावरही निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपाचे जिथे सक्षम उमेदवार आहेत तिथेच मित्रपक्षाने मागणी केली तर त्याचा विचार करावा लागेल. भाजपाच्या उमेदवारांची एकत्र एकच यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

Web Title: Jayakumar gore has responded to the solapur municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • BJP
  • Jaykumar Gore
  • Solapur

संबंधित बातम्या

Solapur Crime: 50 तोळे सोन्यासाठी की कटकारस्थान? महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराची हत्या
1

Solapur Crime: 50 तोळे सोन्यासाठी की कटकारस्थान? महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराची हत्या

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
2

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; पुण्यातील ‘या’ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपाच्या विचारात स्त्री-पुरुष समानता नाही, महिलांना दुय्यम स्थान; हर्षवर्धन सपकाळांची टीका
3

भाजपाच्या विचारात स्त्री-पुरुष समानता नाही, महिलांना दुय्यम स्थान; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Solapur Crime: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक पारलिंगी व्यक्तीची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद
4

Solapur Crime: महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक पारलिंगी व्यक्तीची निर्घृण हत्या; सीसीटीव्हीत तीन संशयित कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.