दिल्ली विधानसभेसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध (फोटो- ट्विटर)
नवी दिल्ली: दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार लढत सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेसाठी मतदानो होणार आहे. दिल्लीमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दरम्यान भाजपने आपल्या जाहिरनाम्याचा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपने आपल्या जाहिरनाम्याचा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे. यामध्ये दिल्लीच्या नागरिकांना अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. भाजपने आपल्या जाहिरनाम्यातून केजी ते पिजी पर्यंत मोफत शिक्षण, तसेच ऑटो आणि कॅब चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबद्दल सांगण्यात आले आहे. तसेच भ्रष्टाचार रोखण्याचे आश्वासन देण्यात आले आहे .
विधानसभा चुनाव-2025 के लिए भाजपा का संकल्प पत्र भाग-2#भाजपा_के_संकल्प pic.twitter.com/VZY96Gy6Cs
— BJP Delhi (@BJP4Delhi) January 21, 2025
यंदाच्या निवडणुकीत भाजपच दिल्लीत सरकार स्थापन करेल असा विश्वास मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी दिल्लीतील तरुणांना १५,००० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. याशिवाय अनेक वचने भाजपने आपल्या जाहीरनामा 2 मध्ये दिल्लीच्या नागरिकांना दिली आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यातील पहिला भाग भाजपने जाहीर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ने जाहीरनामा प्रसिद्ध केला. आमची सत्ता आल्यास सध्या सुरू असलेल्या योजना बंद केल्या जाणार नाहीत, अंतर त्यातील भ्रष्टाचार संपवला जाईल असे नड्डा म्हणाले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात कोकोणती आश्वासने दिली आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात.
जाहीरनाम्यात काय?
गरजू विद्यार्थ्याना पीजी ते केजीपर्यंत मोफत शिक्षण
आप सरकारच्या कुशासन आणि भ्रष्टाचाराविरुद्ध झीरो टॉलेरेन्स धोरण तयार करून एसआयटी स्थापन केली जाईल.
ऑटो आणि कॅब चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ
दिल्लीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 2 ते अडीच हजार पेन्शन दिली जाणार आहे. ७० वर्षांवरील व्यक्ती, विधवा आणि अपंगांना ३,००० रुपये मिळणार आहेत. यामध्ये ५०० रुपयांची वाढ देण्यात येणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत महिलांचे मतदान आपल्या पक्षाच्या बाजूने वाढवण्यासाठी सर्व पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. कॉँग्रेस आणि आम आदमी पक्षाप्रमाणे भाजपने देखील दिल्लीतील महिला समृद्धी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच घरगुती सिलेंडरवर 500 रुपये सबसीडी देण्याचे वचन दिले आहे. तसेच होळी आणि दिवाळीत एक सिलेंडर मोफत दिला जाणार आहे. दिल्लीत भाजप सरकार सत्तेत आल्यावर गर्भवती महिलांना २१,००० रुपये एकरकमी दिले जातील आणि पोषण आहार देखील दिला जाईल, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.