
After Operation Sindoor terrorists have become more active in the Valley Security forces on high alert
Terrorist activity Kashmir security forces on alert J&K : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) पुन्हा एकदा दहशतीची सावट दाटू लागली आहे. ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) आणि पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने (Pakistan) भारताविरुद्ध पुन्हा मोठा कट रचल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. विशेषतः दिल्लीसारख्या आत्मघातकी बॉम्बस्फोटांचे मॉडेल आता काश्मीरमध्ये वापरले जाऊ शकते, असा गंभीर इशारा देण्यात आला आहे. चालत्या वाहनांत IED लावून नागरीक आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा डाव असल्याचे उघड झाले आहे.
सुरक्षा दलांकडील आकडेवारीनुसार परिस्थिती चिंताजनक आहे. २०२४ मध्ये ६१ आणि २०२३ मध्ये ६० दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये ठार करण्यात आले. त्यापैकी ४५ दहशतवादी चकमकीत मारले गेले, तर १६ दहशतवादी LOC वरील घुसखोरीच्या प्रयत्नात ठार झाले. या संघर्षामध्ये २१ पाकिस्तानी नागरिक दहशतवादी मारले गेले, तर दुर्दैवाने २८ नागरिक आणि १६ सुरक्षा जवानांनी प्राण गमावले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Regional Conflict : दक्षिण आशियात युद्धाची चाहूल, काबूल होणार रणांगण; पाकिस्तानचा ‘या’ मुस्लिम देशांना अंतिम संदेश
पहलगाम हल्ल्याच्या आधी फक्त ५९ पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्ये सक्रिय होते. पण आता हा आकडा थेट १३१ वर पोहोचला आहे. यात:
असे प्रमाण दिसत आहे. काळजी करण्यासारखी बाब म्हणजे काश्मीर खोऱ्यात सक्रिय असणाऱ्या स्थानिक दहशतवाद्यांची संख्या फक्त ३ आहे. म्हणजेच पाकिस्तान आता स्थानिक भरती नव्हे तर थेट परदेशी दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न करत आहे.
सुरक्षा दलांनी गेल्या काही वर्षांत OGW नेटवर्क उद्ध्वस्त केले आणि स्थानिक दहशतवाद्यांची भरती जवळपास शून्यावर आणली. परंतु आता पाकिस्तान नवीन स्वरूपात भारतात दहशतवाद पसरवत आहे व्हाइट-कॉलर मॉड्यूल. हे दहशतवादी सामान्य नागरिकांसारखे मिसळतात, स्थानिक समाजात रुळतात आणि तिथूनच दहशतवादी कारवायांची योजना करतात. दिल्ली, हरियाणा, यूपी आणि जम्मू-काश्मीर या चार राज्यांमध्ये या नवीन नेटवर्कचे जाळे पसरले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले:
“स्थानिक दहशतवादी संपुष्टात आले, पण आता पाकिस्तान अज्ञात, रडारवर नसलेल्या नवीन तरुणांना भरती करून भारतात घुसवत आहे. हे नेटवर्क आधीपेक्षा जास्त धोकादायक आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gaza Tunnel : शब्दांत न सांगता येणारी युद्धरचना! इस्रायलला गाझामध्ये सापडला रहस्यमय बोगदा, VIDEO VIRAL
गुप्तचर अहवालांनुसार, हिवाळ्यापूर्वी पाकिस्तानचे समर्थित गट मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे LOC, हायवे, प्रमुख शहरं आणि पर्यटन क्षेत्र याठिकाणी सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे.
Ans: ५९ वरून १३१ पर्यंत.
Ans: २०२४ मध्ये ६१ दहशतवादी मारले गेले.
Ans: "व्हाइट-कॉलर" दहशतवादी मॉड्यूल आणि IED आधारित आत्मघातकी हल्ले.