पूर्व किनारपट्टीला वादळाचा धोका (फोटो- ai gemini)
अकवान चक्रीवादळ पुढील दोन दिवसांमध्ये म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश, यानं ओडीशा किनारपट्टीवरुन जाईल असे सांगण्यात येत आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ९० ते ११० किलोमीटर इतका राहण्याची शक्यता आहे. या वेगामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळू शकतात. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आंध्र प्रदेश, यनम आणि ओडिशाच्या विविध भागांत अति ते अति मुसळधार पाऊस कोसळणार असा इशारा देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशात ‘अर्णब’चा तडाखा; लाखोंना फटका, किनारपट्टीवरही मोठे नुकसान
देशातील विविध राज्यांमध्ये हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २१ आणि २२ नोव्हेंबर दरम्यान अनेक राज्यांमध्ये पुस होण्याची शक्यता आहे. २० ते २३ नोव्हेंबर दरम्यान विविध भागांत पावसाची शक्यता आहे.
२० ते २१ नोव्हेंबर दरम्यान छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. जोरदार वारे देखील तिथे येण्याची शक्यता आहे. १८ नोव्हेंबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर पाऊस होऊ शकतो. तर 19 ते 21 तारखेदरम्यान पश्चिम बंगालच्या काही भागात पाऊस होऊ शकतो. झारखंडम ओडीशा राज्यात देखील पाऊस होऊ शकतो. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर संबंधित राज्य प्रशासनाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
देशातील 15 राज्यांत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा; यंदा थंडीही वाढणार
२० ते २१ नोव्हेंबर दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये बऱ्याच मोठ्या क्षेत्रावर मुसळधार पाऊस पडण्याचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, उत्तर भारतात आता थंडीची चाहूल लागली असून हवामानात गारवा वाढला आहे. अनेक राज्यांमध्ये सकाळच्या वेळेस धुक्याची चादर देखील पाहायला मिळत आहे. नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Ans: आंध्र प्रदेश, यानम आणि ओडिशा किनारपट्टीला या चक्रीवादळाचा धोका आहे.
Ans: वाऱ्याचा वेग ताशी ९० ते ११० किलोमीटर राहण्याची शक्यता आहे.






