Ampere Electric Scooter Sales Cross 70,000 Units (फोटो सौजन्य-AI एआय)
विक्रीत 93 टक्क्यांची वाढ
ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड अंतर्गत कार्यरत असलेल्या अँपिअरने यंदा 93 टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत FY26 मध्ये कंपनीच्या 36,452 स्कूटर्सची नोंदणी झाली होती. यंदा त्याच कालावधीत 70,333 नोंदणी झाल्याने कंपनीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
भारतीय ग्राहकांसाठी VinFast आणणार 3 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स; पुढील वर्षी होणार लाँच! जाणून घ्या
या आकडेवारीसह अँपिअर भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्यांमध्ये पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. या लिस्टमध्ये टीव्हीएस, बजाज, एथर आणि हिरो विडा या कंपन्या तिच्या पुढे आहेत. 15 नोव्हेंबर 2026 पर्यंत इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये अँपिअरचा वाटा 5.7 टक्के होता.
Nexus EX+ मध्ये 136Km रेंज
अँपिअरच्या सध्याच्या EV पोर्टफोलिओमध्ये नेक्सस EX+, मॅग्नस GMax, मॅग्नस निओ आणि रिओ Vyb या स्कूटर्सचा समावेश आहे. नुकतीच कंपनीने Ampere Nexus EX+ भारतीय मार्केटमध्ये लाँच केली आहे. तिच्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत ₹1.30 लाख आहे. तर IoT आधारित Intellipack साठी ₹6,000 जास्त मोजावे लागतात. त्यामुळे या व्हेरिएंटची एकूण किंमत ₹1.36 लाख होते.
मारुती 800 चा जगभर डंका! पहिल्यांदाच भारतीय कारला मिळाला FIVA चा ऐतिहासिक सन्मान!
या स्कूटरमध्ये 3kWh LFP बॅटरी आणि ड्युअल-फ्रेम स्टील चेसिस देण्यात आले आहे. एका चार्जमध्ये 136Km रेंज मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. Carbon Knight आणि Steel Grey अशा 2 रंगांमध्ये ती मिळते. Intellipack मध्ये 30 पेक्षा जास्त स्मार्ट फीचर्स असून लाइव्ह ट्रॅकिंग, जिओ फेन्सिंग, नेव्हिगेशन आणि बॅटरी हेल्थ स्कोअर यांचा समावेश आहे.
इलेक्ट्रिक बाईक आणण्याचीही तयारी
अँपिअरने मॅग्नस GMax Intellipack स्कूटरद्वारे 15 दिवसांत 4,000Km पेक्षा जास्त अंतराची Ultimate Endurance Ride पूर्ण केली आहे. हा प्रवास अरुणाचल प्रदेशातील डोंग व्हॅलीपासून गुजरातमधील गुहार मोतीपर्यंत झाला.
कंपनी आता इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमध्येही प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अँपिअर Xyber कॉन्सेप्टचे डिझाइन पेटंट भारतात दाखल करण्यात आले आहे. या बाईकचे प्रोडक्शन मॉडेल 2027 भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये सादर होण्याची शक्यता आहे.
Ans:
Ans:
Ans:






