Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sundar Pichai : AI मुळे तब्बल १.८० लाख नोकऱ्या जाणार? अखेर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोडलं मौन

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) झपाट्याने विकास होत आहे. दरम्यान AI मुळे सुमारे 1.80 लाख नोकऱ्यांवर गंडांतर येऊ शकते, असा अंदाज काही अहवालांमधून व्यक्त करण्यात आला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 08, 2025 | 01:32 PM
AI मुळे तब्बल १.८० लाख नोकऱ्या जाणार? अखेर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोडलं मौन

AI मुळे तब्बल १.८० लाख नोकऱ्या जाणार? अखेर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोडलं मौन

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (AI) झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात नोकऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. AI मुळे सुमारे 1.80 लाख नोकऱ्यांवर गंडांतर येऊ शकते, असा अंदाज काही अहवालांमधून व्यक्त करण्यात आला आहे. यावर आता गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी मौन सोडले असून AI आणि नोकऱ्यांबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.

पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले ‘आता बनल्या IAS अधिकारी; प्रिया राणीची संघर्षमय प्रेरणादायी वाटचाल’

गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, AI तंत्रज्ञान नोकऱ्या हिरावून घेणार नाही, तर कर्मचाऱ्यांना सहाय्य करणारी ठरणार आहे. AI ही एक “अ‍ॅक्सेलरेटर” म्हणजेच कामाला गती देणारे साधन आहे. इंजिनिअर्सना रोजच्या कंटाळवाण्या कामांपासून हे तंत्रज्ञान मुक्त करून अधिक महत्त्वाच्या आणि सर्जनशील कामांकडे वळण्यास मदत करेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

गुगलने 2023 मध्ये 12,000 आणि 2024 मध्ये 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं. मात्र, 2025 मध्ये कंपनीने फारच मर्यादित आणि टार्गेटेड स्वरूपातच कपात केली आहे. जसं की क्लाउड टीममधील 100 पेक्षा कमी आणि डिव्हाइसेस युनिटमधील काही शंभर कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर कपातीचा कोणताही धोका नाही.

महाराष्ट्राच्या विद्युत विभागात नोकरीची संधी! कोण करू शकतो अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

भविष्यातील संधी

पिचाई यांच्या म्हणण्यानुसार, गुगल AI चा वापर नवीन उत्पादने आणि सेवा विकसित करण्यासाठी करत आहे, ज्यामुळे भविष्यात नवीन नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील. त्यांनी ‘वायमो’ (सेल्फ-ड्रायव्हिंग कार), क्वांटम संगणक आणि यूट्यूब सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचा उल्लेख केला. विशेषतः भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत यूट्यूबची वाढ ही गुगलसाठी मोठी संधी असल्याचं ते म्हणाले.

AI मुळे नोकऱ्यांवर धोका निर्माण होणार असल्याच्या भीतीवर सुंदर पिचाई यांनी पडदा टाकला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, AI हे कर्मचाऱ्यांचे प्रतिस्पर्धी नाही, तर सहकारी आहे. त्यामुळे भविष्यातील कामकाज अधिक वेगवान, प्रभावी आणि सर्जनशील होणार आहे. गुगलमध्ये छटणीचा धोका फारसा नाही, उलट नव्या तंत्रज्ञानामुळे रोजगारनिर्मितीच होणार आहे.

Web Title: Almost two lakh job lost due to ai google ceon sundar pichai broke his silence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • ai
  • AI technology
  • google ceo

संबंधित बातम्या

”मी देवाच्या आश्रयात..”, व्हायरल AI व्हिडीओवर जावेद अख्तरांचा संताप, कायदेशीर कारवाईचा इशारा
1

”मी देवाच्या आश्रयात..”, व्हायरल AI व्हिडीओवर जावेद अख्तरांचा संताप, कायदेशीर कारवाईचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.