लवकरच बिहार विधानसभा निवडणूक होणार
अमित शहा यांची कॉँग्रेसवर टीका
राहुल गांधींच्या यात्रेवर घणाघात
Amit Shah On Congress: बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणुचे बिगूल वाजणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, कॉँग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉँग्रेसवर टीका केली आहे. घुसखोरांच्या मदतीने कॉँग्रेस जिंकण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका शहा यांनी केली आहे.
अमित शहा यांनी कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींच्या ‘मत अधिकार यात्रे’वर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार टीका केली आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बिहार दौऱ्यावर आहेत. त्याआधीच तयांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मत अधिकार यात्रा सुरू केली आहे. या माध्यमातून केंद्रातील आणि बिहारमधील सत्ताधारी पक्षावर ते टीका करत आहेत. दरम्यान अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्या मत अधिकार यात्रेला घुसखोरांची यात्रा असे संबोधले आहे.
नेमके काय म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?
काही दिवस आधीच राहुल गांधी घुसखोरांची एका यात्रा घेऊन फिरत होते. राहुल गांधी कोणाला वाचवायला निघाले आहेत. कॉँग्रेस पक्षाने घुसखोर बचाव यात्रा काढली आहे. कॉँग्रेसच्या लोकांना भारताच्या नागरिकांवर नाही तर घुसखोरांवर विश्वास आहे. त्या आधारावार ते निवडणूक जिकण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा ‘एसआयआर’चे समर्थन करते.
अमित शहा करणार 15 विकास प्रकल्पांचा शुभारंभ
तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यात राजधानी दिल्लीमध्ये या दिवसाचे वेगळेच महत्त्व आहे. कारण, दिल्ली सरकारने “सेवा पंधरवडा” कार्यक्रमाची घोषणा केली आहे. या विशेष उपक्रमांतर्गत तब्बल ७५ नवीन योजना राबवल्या जाणार असून, त्याचा थेट फायदा नागरिकांना होणार आहे. याच अनुषंगाने, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये १५ मोठ्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.
modi @75: मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीला विकासाची मोठी भेट; अमित शहा करणार 15 विकास प्रकल्पांचा शुभारंभ
हा पंधरवड्याचा उपक्रम म्हणजेच “सेवा पंधरवडा” १७ सप्टेंबर रोजी सकाळी औपचारिकरीत्या सुरू होणार आहे. कार्तव्य पथावर “धन्यवाद मोदीजी” या कार्यक्रमांतर्गत रक्तदान शिबिर, प्रदर्शन आणि सेवा संकल्प पदयात्रा आयोजित केली जाईल. इंडिया गेटजवळ होणाऱ्या या भव्य शिबिरात १,००० युनिट रक्त गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समाजातील प्रत्येक घटक या उपक्रमात सहभागी व्हावा, हा सरकारचा उद्देश आहे.