अरुणाचल प्रदेश : अरुणाचल प्रदेश मधून एका भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टर (Helicopter)अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. तवांग (Tawang) जिल्ह्यात हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला असून आणखी एक जण जखमी असल्याची माहिती आहे.
[read_also content=”उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; 500 मीटर खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/india/bus-fell-into-500-meters-deep-valley-25-people-died-at-accident-in-uttarakhand-nrps-332802.html”]
अरुणाचल प्रदेशमधील तवांग जिल्ह्यातील जेमीथांग सर्कलच्या बाप टेंग कांग धबधब्याजवळील न्यामजांग चू येथे आज सकाळी भारतीय लष्कराचं हेलिकॉप्टर ‘चित्ता’ कोसळलं. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या अपघाताचे नेमकं कारण समजू शकले नाही.
An Indian Army Cheetah helicopter crashed today near Tawang area in Arunachal Pradesh. One pilot has lost his life in the accident: Army Officials pic.twitter.com/5BErWZzRIH
— ANI (@ANI) October 5, 2022