अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असणारे माजी मंत्री आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले (वय ६६) यांचे दुःखद निधन झाले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतरच त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. शुक्रवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शहरातील साईदीप सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्राणज्योत मावळली. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. १९९५ पासून ते विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. सरपंच ते थेट आमदारकीला गवसणी घालणारे भाजपाचे जेष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांचे तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच दरारा पाहायला मिळाला. ‘